चढ्याभावाने बी- बियाणे विक्री करणार्या कृषि केंद्र संचालक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची ५० शेतकर्यांची मागणी.

मानवत // प्रतिनिधी.
आज दिनांक: 11/06/2024 तालूका कृषी अधिकारी, पंचायत समिती
मानवत तालुक्यातील कृषि केंद्र संचालक मालकांनी चढ्या भावाने बी- बियाणे, रासायनिक खते विक्री करुन शेतकर्याची लूट करीत आहे. शेतकर्यांची लूट करणार्या कृषिकेंद्र संचालकाची चौकशी करून परवाना निलंबन करण्याची मागणी तालूका कृषि अधिकारी मानवत यांच्याकडे एका शिष्टमंडळा द्बारे शेतकर्यांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मृगाचा पाऊस बर्या पैकी बरसला असून तालूक्यातील शेतकरी पेरणी व लागवडीकडे वळला आहे. पण मानवत तालूक्यातील कृषिकेंद्र संचालक मात्र बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा भावात बी- बियाणे विक्री करून शेतकर्यांची लूट करीत आहे. याकडे कृषि जिल्हाधिकारी , कृषि तालूका अधिकारी यांनी लक्ष देऊन कृषि संचालकांची चौकशी करून परवाना निलंबीत करावा अशी मागणी तालूक्यातील शेतकर्यांनी एका निवेदना द्बारे केली आहे.
उपरोक्त विषयास अनुसरुन आम्ही खालील सही करणार शेतकरी मौजे मानवत ता.मानवत जि.परभणी येथील रहिवाशी असुन आमची मानवत शिवारात शेत जमीन आहे सध्या पेरणीचे दिवस असल्यामुळे व पाऊस मुबलक प्रमाणात पडल्यामुळे शेतक-यांमध्ये पेरणीसाठी तयारी असुन त्याकरिता शेतकरी मानवत मधील वेगवेगळ्या कृषि केंद्रावर बी- बियाणे, रासायनिक खते खरेदी करण्यासाठी तास न तास थांबुन खरेदी करतात. परंतु संबंधीत कृषि केंद्र चालक मोठ्या प्रमाणावर चढ्या दराने खरेदी करतात त्यामध्ये कृषि केंद्र चालक हे शेतक-यांची पिळवणुक करुन जास्त दराने पैसे आकारात त्यामुळे आपण आपले स्तरावर संबंधीत सर्व कृषि केंद्र मालकांवर योग्यती कडक कायदेशीर कारवाई करावी त्यांचा कृषी केंद्र चालकाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर अॅड, विक्रमसिंह दहे, अॅड, सतिष चव्हाण, अॅड, भूषण दवंडे, अॅड, संतोष लाडाणे, भगवतराव दहे, उध्दवराव दहे, राजाराम दहे, गोविंद दहे, अभयसिंह दहे, मधूकर दहे, बाळू कारके, बाळू लेंगूळे, उत्तम दहे, गणेश दहे, सोपान दहे, गणेश दहे, सुदाम दहे, हरिभाऊ दहे, निखिल कच्छवे, अमित देवधर, रामराव दहे, शेख यूनूस, शेख अनीस,शेख मुस्तफा , अतिक बागवान, रफिक बागवान, मोबीन कूरेशी, आझम कुरेशी, अश्पाक कुरेशी , गोपाळ दहे, दिलिप दहे, अशोक दहे,बिज्जू कच्छवे, सतिष जाधव , शंकर जाधव, शाम आकात, हनूमान जाधव , वसंत बल्लाळ, विठ्ठल जाधव , गोपाळ जाधव, माधव जाधव, माहादेव आवचार,उध्दव आवचार, बबन आवचार, बबन आवचार, बाबासाहेब आवचार, विष्णू आवचार, राजू होंडे, कृष्णा निर्वळ, आदींच्या स्वाक्षर्या आहे.
**