https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

देगलूर महाविद्यालयात नवमतदारांचे सीईओ करनवालांनी केले गुलाबपुष्प देऊन स्वागत* · **राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करण्‍याचे आवाहन

नांदेड, 18 एप्रिल- नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल आणि मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्याकडे स्वीपची जबाबदारी देण्यात आली आहे. आज गुरुवार १८ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी देगलूर महाविद्यालय देगलूर येथील नवमतदार युवक-युवतींशी संवाद साधला. सुदृढ लोकशाहीसाठी मतदान हा महत्त्वाचा घटक असून नव मतदारांनी याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी 143 नवमतदारांचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता राष्ट्रीय कार्य म्हणून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीचे महत्त्व, मतदानाची जबाबदारी, युवा मतदारांचे कर्तव्य, निवडणूक प्रक्रिया आदीबाबत युवकांशी संवाद साधताना त्यांनी माहिती दिली. दरम्यान महात्मा गांधी पुतळा ते देगलूर तहसील कार्यालयपर्यंत मतदान जनजागृतीला रॅली काढण्यात आली. मानव विकास हायस्कूल, साधन हायस्कूल, देगलूर महाविद्यालयाचे विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यात सहभागी झाले होते. विविध घोषणांनी देगलूर शहर दुमदुमून केले होते. यावेळी मी मतदान करणारच या विषयाच्या काढलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधले होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते मी मतदान करणार या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, तहसीलदार राजाभाऊ कदम, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य उत्तम कुमार कांबळे, गट विकास अधिकारी शेखर देशमुख, गटशिक्षणाधिकारी तोटरे आदींची उपस्थिती होती.

माझं मत, माझी जबाबदारी मतदानाला नक्की या कारेगाव येथे मतदान पोलचिठ्ठीचे वाटप मतदारांना मतदार माहिती चिठ्ठी अर्थात पोलचीट वाटप करण्यात येते. या चिठ्ठीमध्ये मतदारांचे नाव, भाग क्रमांक, खोली क्रमांक आदी आवश्यक माहिती असते. देगलूर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायत येथे आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मिनल करनवाल यांनी मतदारांना घरोघरी जाऊन पोलचीटचे वाटप केले. मतदान ही प्रत्येकाची जबाबदारी असून प्रत्येकाने 26 एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी गावकऱ्यांना त्यांनी मतदानाची शपथ दिली. याप्रसंगी गावकऱ्यांनी मतदान करणार असल्याचा निर्धार केला. मोफत सर्विसिंग सोबत आता हिरो दुचाकी खरेदीवर एक हजाराची सूट देगलूर येथील हिरो सर्विसिंग व हिरो शोरूमचे मालक प्रमोद चौधरी यांनी मतदान करणाऱ्यांना दिनांक 26 ते 30 एप्रिल दरम्यान हिरो गाडी मोफत सर्विसिंग करून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. आज या शोरूमला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी भेट दिली.

याप्रसंगी चौधरी यांनी मतदान प्रक्रियेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास हिरो दुचाकी गाडी खरेदीवर एक हजार रुपयाची सूट देण्याचे जाहीर केले. याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौधरी यांचे अभिनंदन करून आभार मानले. सामाजिक दायित्वाने आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी चौधरी यांनी मोफत गाडी सर्विसिंग व मतदान प्रक्रियेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हिरो गाडी खरेदीवर एक हजाराची सूट दिली आहे.

00000

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704