https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथे इदगाह मैदानावर रमजान ईद ऊत्साहात साजरी

मानवत // प्रतिनिधी.

बुधवारी सायंकाळी चंद्र दर्शन झाल्यामूळे दि. ११  एप्रिल रोजी मानवत शहरातील उक्कलगाव रोड वरील मोठी ईदगाह येथे सार्वजनिक ईदची नमाज सकाळी साडेआठ वाजता अदा करुन ईद ऊल फिञ अर्थात रमजान ईद मोठ्या ऊत्साहात मुस्लीम बांधवांनी साजरी केली.
या वेळी मौलाना खुदबा हाफेज अय्याज यांनी  दिला मौलाना हाफेज हाजी मोहम्मद लतिफ यांनी सार्वजनिक नमाज पठण केली. सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
सविस्तर वृत्त असे की,
भारत देशामध्ये सामाजिक सलोखा व भाईचारा कायम राहावा, सोशल मीडिया चा वापर योग्य करावा कोणाच्या ही भावना दुखवणारी पोस्ट टाकू नये, त्याच बरोबर आपण एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर करावा असा संदेश धर्मगुरू मौलाना असलम खान इशाती यांनी दिला . मौलाना मुजाहिद यांनी मानवत नगर परिषद व पोलीस प्रशासन यांचे आभार व्यक्त केले. या वेळी ईदगाह मैदानावर नागरिकांसाठी आझाद पाणी सप्लायर यांच्या वतीने मोफत जारचे पाणी उपलब्ध केले होते. नमाज पठणा नंतर सामूहिक प्रार्थना दुवा करण्यात आली. तर पोलीस प्रशासन व मानवत नगर परिषद प्रशासन आणि राजकीय पुढारी यांना  जमाते इस्लामी हिंदच्या वतीने  दिव्य कुराण मराठी अनुवाद भेट देऊन  शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी मानवत पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक मा. दिपकजी दंतुलवार, माजी नगर सेवक आनंद मामा भदर्गे, माजी नगर सेवक दिपक बारहाते, माजी नगर सेवक अॅड. ॠषिकेशजी बारहाते, मा. प्राध्यापक पवनजी बारहाते,फकिररावजी सोनवने, श्रीकांतजी देशमुख, अॅड, विक्रमसिंहजी दहे ,भारत पवार ,आदीनी ईदगाह मैदानात उपस्थीत राहुन मुस्लिम बांधवाना ईद निमित्त पुष्प गुच्छ देऊन *ईद मुबारक* अशा शुभेच्छा दिल्या.
तसेच सध्या लोकसभा निवडणूक असल्याने मतदान करणे किती गरजेचे हे नागरिकांना पटवून दिले व मतदान करून लोकशाहीला बळकट करावे असे आवाहन यावेळी धर्मगुरू यांनी केले.
*मानवत शहरासह तालूक्यात आज रमजान ईद मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली.*

०००

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704