https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत नगर परिषदच्या सभागृहा मध्ये *मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांच्या हस्ते* दिव्यांग बांधवांना दिव्यांग कल्याण निधीचे वाट

मानवत / प्रतिनिधी.
>मानवत नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक. संकीर्ण/ 2015/ प्र.क.-118/ नवी-20 दि.28/10/2015 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण उत्पन्नातून शहरातील दिव्यांगांना त्यांच्या कल्यानार्थ राखून ठेवलेल्या निधीतून साल सन 2023-24 या वर्षासाठीचे अनुदान मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे तथा प्रशासक नगर परिषद मानवत यांच्या हस्ते अथक परिश्रमाने व कार्य तत्परतेने वितरित करण्यात आले आहे. नगर परिषद मानवत कार्यालयामार्फत सालसन 2023-24 साठी शहरातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यां कडून अर्ज मागविण्यात आले होते आजपर्यंत नगरपरिषद कार्यालयात मध्ये 170 अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार नगरपरिषद मार्फत राखीव ठेवण्यात आलेल्या निधी तीन लक्ष सहा हजार रुपये तरतूद करण्यात आलेला निधी प्रत्येकी एक हजार आठशे रुपये वाटप करण्यात आला.
यामुळे शहरातील दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले असून नगर परिषदेचे आभार व्यक्त करत आहेत. मूख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी अधिक माहिती देताना असे सांगितले की दिव्यांगा बांधवांना जीवन जगत असताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नगर परिषदेच्या कार्यालयामार्फत अर्थसाह्य म्हणून जो निधी उपलब्ध करून दिला जात आहे त्यामधून त्यांचे जीवनमान थोड्याफार प्रमाणात उंचावण्यास मदत होईल. तसेच नगरपरिषदेमार्फत सर्व योजना तत्परतेने तळागाळातील लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी शंभर टक्के उद्दिष्ट साध्य होण्यासाठी कार्यालयामार्फत योग्य ती खबरदारी व काळजी घेण्यात येत आहे प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा हाच माझ्या कारकिर्दीतला योग्य कामाचा दाखला असेल. तसेच दिव्यांग बांधवांच्या आरोग्य विषयी व त्यांच्या सर्व समस्या विषयी योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. व तसेच स्वच्छता, आरोग्य,पाणीपुरवठा याकडे सुद्धा विशेष लक्ष नगर परिषदेमार्फत दिले जात आहे. या कार्यक्रमास उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांचे नगरपरिषदेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी श्री गोपाळजी लाड दिव्यांग जिल्हा संपर्कप्रमुख यांनी अपंग बांधवांसाठी हा निधी किती महत्त्वाचा आहे हे आवर्जून सांगितले. तसेच श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत यांचे व नगरपरिषद प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद मानवत यांनी केले. तसेच सूत्रसंचालन श्री.हनुमंत बिडवे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्रीमती वंदना इंगोले दिव्यांग कल्याण निधी विभाग प्रमुख, तसेच नगर परिषद मानवत चे कर्मचारी अभियंता श्री सय्यद अन्वर,कार्यालीयन अधीक्षक
श्री भगवान शिंदे,आर.बी.चव्हाण, भारत पवार,मुंजासा खोडवे,महेश कदम, एस.बी उन्हाळे,श्री.रवी दहे,सातभाई, संतोष खरात,राजेश शर्मा, मनमोहन बारहाते,नारायण व्यवहारे, भगवानराव बारटक्के,एस.एन,रुद्रवार, श्रीमती शितल सोळंके, श्रीमती संतोषीबाई पल्लोड, श्रीमती सुनिता वाडकर,पी.आर.पवार, विनय आडसकर, एस.एस काळे, नारायण काळे, मुंजाजी डोळसे, सचिन,रवी दहे, सोनवणे,यशपाल भदर्गे, रितेश भदर्गे, शेख वसीम,सय्यद जावेद,सुनील कीर्तने,संजय कुऱ्हाडे,,दीपक भदर्गे, बाळू लाड,बळीरामजी दहे,अलीम अन्सारी, संजय कुऱ्हाडे, इत्यादींनी सदरील कार्यक्रम यशस्वीरित्या सफल होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
तसेच या कार्यक्रमास शहरातील दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात या वेळी उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704