https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या मानवत बस स्थानकात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

मानवत बस स्थानकातील पोलिओ बूथ वर २९७ बालकांना पोलिओचे डोस.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोष वाक्य घेऊन 3 मार्च 2024 रविवार रोजी संपूर्ण राज्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या दिवशी ग्रामीण व शहरी भागातील 5 वर्षा पर्यंतच्या सर्व बालकांना वैद्यकिय अधिक्षक डाॅ. नरेंद्र वर्मा आणि ए.एम. पठाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण केंद्रावर पोलिओची लस दिली जात आहे.
त्या निमित्ताने बाहेर गावाला जाणारे व येणारे प्रवाशी नागरिकांच्या बालकांसाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या मानवत बस स्थानकातील बुथवर टी.एस.पी. इंन्स्टिट्यूट मानवत चे प्राचार्य ब्रम्हा साबळे यांच्या मार्गदर्शनाखाले दंत्त सहाय्यक , कपिल सोनटक्के , जी.एन.एम. अजय कदम, जी.एन.एम. मंचक रणखांबे हे प्रवासा दरम्यान ये जा करणार्‍या प्रवाशांच्या बालकांना पोलिओ लस देण्याची मोहिम राबवित आहेत.
त्यांनी मानवत बस स्थानकातील पोलिओ बुथ केंद्रावर दिनांक ३ मार्च ते ८ मार्च या दरम्यान २९७ बालकांना *दो बुंद जिंदगी के लिए* पोलिओची मात्रा दिली आहे. या वेळी पत्रकार राम दहे , रापमचे कर्मचारी वाहतूक नियंत्रक तेलभरे , राजेश ढालकरी, यांच्यासह या वेळी बस स्थानकातील प्रवाशी बांधव व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704