https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

आयुष्यात केवळ शिक्षण व ज्ञानाने क्रांती शक्य -डॉ.कमलाकर चव्हाण

नांदेड:(दि.४ मार्च २०२४)
विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत कौशल्य आत्मसात केली पाहिजेत.महाविद्यालयीन जीवनात शिक्षणाविषयी गांभीर्य नसेल तर भविष्यकाळ कठीण जात असतो. विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी प्रेरणा घेऊन प्रयत्नवाद स्वीकारला पाहिजे. आयुष्यामध्ये केवळ शिक्षण व ज्ञानानेच क्रांती शक्य आहे. विद्यार्थ्यांनी आर्थिकतेपेक्षा मानवता जपली पाहिजे; असे प्रतिपादन योगानंद स्वामी महाविद्यालय, वसमत येथील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक डॉ.कमलाकर चव्हाण यांनी केले.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात ‘यशवंत वार्षिक युवक महोत्सवा’च्या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.


याप्रसंगी विचारमंचावर सोहळ्याचे अध्यक्ष संस्थेचे कार्यकारणी सदस्य श्री.पांडुरंगराव पावडे, प्रमुख उपस्थिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, युवक महोत्सवाचे समन्वयक डॉ.संजय ननवरे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे म्हणाले की, युवक महोत्सवानिमित्त विविध कलाप्रकारात सहभाग घेतल्यानंतर विद्यार्थी रचनात्मक, विधायक व संशोधनात्मक कार्याकडे वळले पाहिजे. विद्यार्थी हेच देशाचे भविष्य असून भारत ज्ञानसत्ता झाल्याशिवाय महासत्ता बनू शकणार नाही. आविष्कार, अन्वेषण या संशोधनपूरक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रस्तरावर प्रतिनिधित्व केले पाहिजे.
अध्यक्षिय समारोपात श्री. पांडुरंगराव पावडे यांनी, युवक हे राष्ट्रांमधील प्रचंड ऊर्जा व शक्ती असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे सूप्त गुण असतात. प्रत्येक माणूस हा इतरांपेक्षा वेगळा असून अभ्यासाव्यतिरिक्त इतर कलागुणांना वाव देणे, हा युवक महोत्सवाचा खरा उद्देश असतो. युवक हा सुरक्षित व सुशिक्षित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे विचार व्यक्त केले.
प्रारंभी प्रास्ताविकात समन्वयक डॉ.संजय ननवरे यांनी, युवक महोत्सवात आयोजित विविध विषयांवरील स्पर्धेची इत्यंभूत माहिती दिली.
सूत्रसंचालन प्रा.भारती सुवर्णकार आणि प्रा.प्रियंका शिसोदिया यांनी केले. डॉ.संजय जगताप यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. शेवटी आभार डॉ.रत्नमाला मस्के यांनी मानले.
सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी डॉ.अजय गव्हाणे, डॉ. विश्वाधार देशमुख, डॉ.शिवराज शिरसाठ, ग्रंथपाल डॉ. कैलास वडजे, डॉ.मोहम्मद आमेर, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, संजय भोळे, व्ही.पी.सिंग ठाकूर यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी डॉ.महेश कळंबकर, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ.वनदेव बोरकर, डॉ.एल.व्ही.पद्माराणी राव, डॉ. मीरा फड, डॉ.दीप्ती तोटावार, डॉ.कविता केंद्रे, डॉ.अंजली जाधव, डॉ.विजय भोसले, डॉ.संभाजी वर्ताळे, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.बालाजी भोसले, डॉ.साईनाथ बिंदगे, प्रा.सोनाली वाकोडे, डॉ.रामराज गावंडे, डॉ.भरत कांबळे, डॉ. नीरज पांडे, डॉ.धनराज भुरे, डॉ.नीताराणी जयस्वाल, डॉ.एच.एल.तमलुरकर आदींसह विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी- विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704