https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

आज जिजाऊ सभागृहा मध्ये मराठा आरक्षण संदर्भात सकल मराठा समाज बांधवांच्या महत्वाच्या बैठकीचे आयोजन.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील सर्व सकल मराठा समाज बांधवाची मराठा आरक्षणा संदर्भात महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आप आपले मत व्यक्त करावे असे आवाहन सकल मराठा समाज तालूका समितीच्या वतीने करण्यात आले.
राज्यात गरजवंत मराठयांचा लढा आप आपल्या राजाला परिने सूरू असून मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे लढ्याचे नेतृत्व करीत आहेत. राज्यसरकारने गरजवंत मराठ्यांना आरक्षणाच्या नावावर झूलत ठेवले असून सगे सोयरे यांच्यासह मराठा समाज बांधवांना कूणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये आरक्षणाची मागणी असून ही सरकार मात्र मराठा समाजाची दिशाभूल करीत आहे. त्या संदर्भात मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे आंदोलन उभे करीत असून त्यासाठी सर्व गरजवंत मराठा समाज बांधवांनी आपल्या मूला बाळाच्यां कल्याणासाठी साथ द्या असे आवाहन करण्यात आले असून त्या संदर्भात आज भव्य तालुका स्तरीय बैठकीचे आयोजन मानवत येथील जिजाऊ सभागृहात ठिक १० वाजता करण्यात आले आहे. तर राज्यसरकार कुणब्याच्या पोराला चक्रव्युहात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व मराठा समाजाचा लोकशाही पद्धतीने सुरु असलेल्या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्य कर्तेच्या हुकुमशाहीला लोकशाही पद्धतीने विरोध करण्यासाठी एकत्र या असे आवाहन सकल मराठा समाज तालूका समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे स्थळ , जिजाऊ सभागृह मानवत येथे रविवार ०३/०३/२०२४ वेळ -साकळी. 10 वाजता सकल मराठा समाज, मानवत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704