https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

व्ही.पी.लाड, एस.डी. नेवरेकर यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करा.

हत्तलवाडी ग्रामस्थांची मानवत तहसीलदार यांच्याकडे मागणी

> दोन्ही शिक्षकांना तात्काळ मानवत तहसील कार्याल येथून कार्यमुक्त करा ; अन्यथा शाळेला टाळा ठोकण्याचा इशारा < ___________________________________ मानवत / प्रतिनिधी. मानवत तालुक्यातील मौ. हत्तलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत व्ही. पी. लाड यांची २०१९ पासून शाळेत नियुक्त आहे तर एस. डी. नेवरेकर हे जून २०२३ पासून नियुक्त आहेत परंतु चार वर्षांत हे शाळेत तीन ते चार महिने प्रत्येक्ष कार्यरत आहेत ते मानवत तहसील कार्यालय येथे प्रतिनियुक्तीवर आहेत त्यामुळे विदयार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत असून यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी हत्तलवाडी येथील सरपंच कृष्णा शिंदे पाटील , सर्जेराव शिंदे पाटील , माऊली शिंदे पाटील , सुनिल कापसे पाटील , त्र्यंबक शिंदे पाटील , प्रभाकर शिंदे पाटील , घनश्याम शिंदे पाटील, अरूण शिंदे पाटील, सुदर्शन शिंदे पाटील, परमेश्वर यमगर , यांच्या सह शेकडो ग्रामस्थांच्या वतीने मानवत तहसीलदार तथा पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे एका निवेदना द्बारे करण्यात आली असून त्यांची प्रति नियुक्ती रद्द न केल्यास शाळेस टाळे ठोकण्यात येईल असा इशारा ही ग्रामस्थांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, दोन्ही शिक्षक हे मानवत तहसील कार्यालयात २०२३ पासून प्रतिनियुक्ती वर आहेत त्यामुळे गणित आणि विज्ञान अशा महत्वाचा विषयाचे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत असून याचा गुणवत्तेवर मोठा परिणाम होत आहे तर शिक्षक उपलब्ध नसल्याने बरेच विद्यार्थी टी. सी. घेऊन जात आहेत व्ही. पी. लाड हे येथील B.L.O. आहेत मात्र गावात कधीच येत नाहीत आणि एस. डी. नेवरेकर हे मे २०२३ पासून नियुक्त आहेत तसेच त्यांना ऑक्टोबर २०२३ ते २२ जानेवारी २०२४ पर्यंत ई. व्ही. एम. व्ही. व्ही. पॅट जन जागृती साठी कार्यमुक्त आहेत तरी दोन्ही शिक्षकांना मानवत तहसील कार्यालया मधून तात्काळ कार्यमुक्त करावे व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे अन्यथा १५ जानेवारी पासून शाळेला टाळे ठोकण्यात येईल अशा ईशारा हत्तलवाडी येथील शेकडो ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला असून निवेदनावर *शेकडो हत्तलवाडी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.* **

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704