ताज्या बातम्या

इरळद जि. प. शाळेतील कार्यरत शिक्षकांच्या प्रशासकिय कारणास्तव बदल्या न करण्याची मागणी.

ग्रामस्थांची जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौजे. इरळद येथील जिल्हा परिषद शाळेतील कार्यरत शिक्षकांच्या प्रशासकिय कारणास्तव बदल्या करण्यात येऊ नये अशी मागणी इरळद येथील शिक्षण प्रेमी ग्रामस्थांनी परभणी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिनांक २३ जानेवारी रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे,
यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि,
तालूक्यातील मौजे इरळद येथील जिल्हा परिषद शाळा ही भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी अंतराष्ट्रीय शाळा म्हणून महाराष्ट्र अंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ पुणे यांनी ०९ ऑगस्ट २०१९ रोजी मान्यता दिली.
परंतु मागील सरकारने या मंडळास स्थगिती दिली. त्याचे रूपांतर काही निकष लावून आदर्श शाळा मध्ये केले. त्या निकषात इरळद येथील जिल्हा परिषद शाळा पात्र ठरली याचे कारण म्हणजे येथील कार्यरत असणारे आदर्श शिक्षक श्री. प्रकाश मोहकरे, श्री. उमाकांत हाडूळे, श्रीमती रोहिणी खोंडे यांचे परिश्रम. तसेच लोक सभागातून ३३ लक्ष रुपये निधी उभा करून शाळेसाठी एक एक्कर दहा गुंठे जमीन खरेदी केली. व लोक प्रतिनिधी यांच्या कडे वेळो वेळी पाठ पुरावा करून बारा वर्ग खोल्या सि. सि. टी. व्ही कॅमेरे व इतर सोयी सुवेधे सह सुसज्ज इमारत तयार केली. तसेच कोरोना काळात शाळा बंद असताना ही तात्कालीन गट शिक्षणाधिकारी संजय ससाणे व शिक्षक प्रकाश मोहकरे अभ्यास गट घेत होते.
तर शिक्षक उमाकांत हाडूळे यांनी इंग्रजी भाषा विषयक विविध उपक्रम राबवले यामुळे विद्यार्थी इंग्रजी भाषा शिकू लागले. तरी इरळद जिल्हा परिषद शाळेतील कार्यरत शिक्षकांना प्रशासकिय बदलीतून वगळण्यात यावे जर बदली झाली तर २५ जानेवारी पासून परभणी जिल्हा परिषदे समोर उपोषण करण्यात येईल असा ईशारा शिक्षणप्रेमी नागरीकांनी निवेदनात देण्यात आला असून निवेदनावर संदीप मुळे, गंगाधर खरात, अशोक कचरे, लक्ष्मण मुळे, विष्णू बारहाते, दत्ता मुळे, यांच्या सह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

***

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button