भोसा जिल्हा परिषद शाळेची इंद्रायणी माळावर निसर्ग सहल व स्वच्छता अभियान संपन्न

मानवत / प्रतिनिधी.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिना च्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त मानवत तालुक्यातील मौजे भोसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची निसर्ग सहल दिनांक १७ जानेवारी रोजी मानवत तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान इंद्रायणी माळावर गेली या वेळी विद्यार्थ्यांनी इंद्रायणी माळावरील घण कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावली या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे मानवत तालुक्यातील मौ. भोसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी इंद्रायणीच्या माळावर जाऊन चार भिंती बाहेरील निसर्गात राहुन मनमोकळा आनंद घेऊन झाडाझुडपांची , फुलाफळांची, पशु पक्ष्यांची, तसेच निसर्गातील वस्तूंची अधिक माहिती घेतली.
त्या नंतर तेथील खिचडी पुलावचा आस्वाद घेऊन झाडाखाली सर्व विद्यार्थी बसले. शाळेचे शिक्षक श्री. शंकर भिसे व श्री. बापूराव जोरवर यांच्या निदर्शनास आजूबाजूला पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाॅटल, कॅरीबॅग, कचरा, झाडांचा पालापाचोळा निदर्शनास आला व लगेच सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी कचरा जमा करून या कचऱ्याची विल्हेवाट लावली व येथील इंद्रायणी माळाचा सर्व परिसर स्वच्छ केला. यावेळी भोसा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. उद्धव आर्वीकर, श्री. प्रकाश बिडगर, श्री. तुकाराम भालेराव, श्रीमती पल्लवीताई पाटील,श्रीमती अहिल्याबाईताई जाधव यांनी निसर्ग सहल व स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला या उपक्रमा बद्दल सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
***