ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला :”सिंधूताई सपकाळ..माई”:लैलेशा भुरे

*
**************************
चढली ती दु:खाचा डोंगर
अनाथांना दिली प्रेमळ सावली
गरजूंना नेहमीच मदत केली
त्या मातेने पावलोपावली

गेली निघून जगातून
केले अनाथांना निराधार
माई होती अनाथांची
आता कुठे भटकतील ते दारोदार

कायमच दु:ख तिच्या नशिबी
नाळ जोडली गेली दु:खाशी
हसत दुसऱ्यांना आनंद दिला
ठेवल्या सुखाच्या दुस-यांसमोर राशी

तुझ्यासारखी आई सिंधूताई
न होणे जगात दुसरी
चंद्र-सूर्यही ग्वाही देतील
झेलली नजर जगाची खूपरी

दुसऱ्यांसाठी झटत राहावे
शिकवण दिली तू जगाला
येईल का गं जाग कधी
इथल्या अंध माणसाला

नाही मिळाले तूज सर्वकाही
म्हणून जगणे तू नाही सोडले
प्रत्येकालाच माती व्हायचे आहे
उगाच तू स्वतः नाही मिरवले
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.