https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे भारताची सर्वांगीण प्रगती शक्य: -डॉ.रावसाहेब शेंदारकर

नांदेड:( दि.३१ डिसेंबर २०२३)
कोणत्याही देशाचे भविष्य शैक्षणिक धोरण ठरवीत असते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण:२०२०द्वारे भारताची सर्वांगीण प्रगती शक्य आहे. सध्याच्या युगात ज्ञान शक्ती ही सर्वोच्च आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील सकारात्मक मुद्दे महत्त्वपूर्ण असून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षणासाठी ते अपरिहार्य आहे; असे प्रतिपादन श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर यांनी केले.
यशवंत महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांचे नियोजन व मार्गदर्शनानुसार दि.३० डिसेंबर रोजी आयोजित ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम- रचना आणि अंमलबजावणी’ या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्राच्या अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर उद्घाटक व बीजभाषक इंग्लिश अँड फॉरेन लैंग्वेज युनिव्हर्सिटी, हैदराबाद येथील प्रो.डॉ. जय सिंघ, इंग्रजी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.रोहिदास नितोंडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.डी.एन.मोरे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, इंग्रजी विभागप्रमुख व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव, डॉ.अजय टेंगसे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी प्रा.किरण देशमुख यांनी स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविकात डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव यांनी, स्वातंत्र्यानंतर देशातील विविध शैक्षणिक आयोगांची सविस्तर माहिती दिली तसेच महाविद्यालयातील विविध उपक्रमांची यादी सादर केली.
उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांनी, महाविद्यालयातचा नॅक मूल्यांकनातील यशस्वी योगदानाचा उल्लेख केला. याप्रसंगी डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव यांच्या भगवद्गीता आणि इंग्रजी साहित्य अध्यापन या दोन ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले तसेच विद्यार्थ्यांद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर लिखित भित्तिपत्रकाचे विमोचन झाले.
कार्यशाळेतील प्रमुख वक्ते म्हणून मानव्यविज्ञान विद्याशाखेच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ.शैलाजा वाडीकर, डॉ.रोहिदास नितोंडे, डॉ.डी.एन.मोरे, राजर्षी शाहू कॉलेज, लातूरच्या इंग्रजी विभागप्रमुख डॉ.अनुजा जाधव आणि इंग्रजी अभ्यास सदस्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.माधव दुधाटे यांनी केले तसेच प्रमुख अतिथींचा परिचय डॉ.रत्नमाला म्हस्के यांनी करून दिला आणि आभार डॉ.कैलास इंगोले यांनी मानले.
या कार्यशाळेचा विद्यापीठ परिक्षेत्रातील जवळपास शंभर प्राध्यापकांनी लाभ घेतला. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, संजय भोळे,डॉ.अजय गव्हाणे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यशाळेस डॉ.दुर्गेश रवंदे, मानवत, डॉ.चेरेकर, शंकरनगर, डॉ. राजपाल चिखलीकर, सोनखेड, डॉ.मिरा फड, डॉ.एस.एम.दुर्राणी, प्रा.राजश्री जी.भोपाळे, प्रा.भारती सुवर्णकार,प्रा.पी.पी.सिसोदिया, डॉ.वानखेडे, डॉ.मोहम्मद आमेर, प्रा.शितल सावंत, डॉ.प्रवीण तामसेकर, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.साईनाथ बिंदगे, डॉ.संदीप पाईकराव, डॉ.साईनाथ शाहू आदींसह विविध विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704