https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या” दत्तगुरु”:लैलेशा भुरे

घेतला जन्म
अनुसया पोटी दत्तांनी
त्रिमूर्ती जाहले
ब्रह्मा, विष्णु, महेशांनी

साजरा जन्मोत्सव
चिरंतन अस्तित्वाचा
मार्गशीर्ष पौर्णिमेला
मांगल्याचा पावित्र्याचा

गाय, श्वान सोबती
रूद्राक्ष माळ गळ्यात
त्रिशूळ,डमरू,शंख
चक्र, कमंडलू हातात

दत्तगुरु दिगंबरा
सागर करूणेचा
साजरा महोत्सव
चिरंतन अस्तित्वाचा

अवतार अनंत
घेतले पृथ्वीवर
आशिष दिले भक्तांना
रूप तुझे मनोहर


नाम तुझे दत्ता
घेता सदा मुखी
ठेवितो निरोगी
करी भक्तांना सुखी

तुझे नाव देवा
किती वर्णू तुझी गाथा
तूच माझा त्राता
ठेविते तुझ्या चरणी माथा
**************************
लैलेशा भुरे
नागपुर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704