https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत शहरातील मुख्य रस्त्यावर गौमातेचा मुक्त संचारांमूळे रहदारीस अडथळा

मानवत शहरातील मुख्य रस्त्यावर गौमातेचा *मुक्त संचारांमूळे रहदारीस अडथळा

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील मुख्य रस्त्यावर शहरातील गौमातेसह पशुपालक मालकांची मोकाट जनावरे आपले बस्तान मांडत असून यामुळे शहरातील चौका चौकातील रहदारी व वाहन चालकांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र नगर पालिका प्रशासन कोणता ही उपाय करीत नसल्याने वाहन चालकांचा जीव धोक्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत शहर हे तालूक्याचे ठिकान असून शहरात कापसाची मोठी बाजार पेठे म्हणून सर्वत्र मोठी ओळख आहे त्यामुळे बाहेर जिल्ह्या सह तालुक्यातील शेतकरी कापूस विक्रीसाठी शेतकरी मोठ्या संख्येने वाहने घेऊन येत असतात त्याच बरोबर शहरात दर सोमवारी आठवडी बाजार ही मोठया प्रमाणात भरत असतो त्यामुळे शहरात वाहनांची संख्या मोठी असल्याने वाहतूकीची वर्दळ मोठया प्रमाणात असते परंतु शहरातील नगर परिषदेच्या हद्दीतील पशूपालक यांची मोकाट जनावरे आपले बस्तान शहरातील मुख रस्त्यावरच मांडत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही मानवत नगर परिषदेने मोकाट जनावरांसाठी कोंढवाडा या सारखी अद्यावत उपाय योजना करावी अशी मागणी सामान्य मानवत शहरातील सामान्य नागरिकांतुन होत आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704