ताज्या घडामोडी

मानवत तालुक्यात तीन दिवस सतत अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या* *भारत राष्ट्र समितीची मानवतचे तहसीलदार यांच्याकडे मागणी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील गेली तीन दिवस सतत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती त्यामुळे मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भारत राष्ट्र समिती पक्षाचा वतीने ३० नोव्हेंबर रोजी मानवत तहसीलचे तहसीलदार रणजित सिंग कोळेकर यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी दिलवल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, मानवत तालुक्यात २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे खरीप मधील कापूस, तूर आणि रब्बी मधील हरभरा, ज्वारी करडई तसेच फळबागाचे अतोनात नुकसान झाले आहे नुकसान झालेल्या शेती पिकाचे महसूल विभागा ने नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावे व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये व फळ बागेसाठी हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली असून निवेदनावर भारत राष्ट्र समिती समन्वय क बालासाहेब आळणे पाटील , हनुमान मसलकर खडकवाडीकर , संतोष मसलकर, अ‍ॅड. सतीश बारहाते, प्रा. प्रकाश भोसले, भगवान मुळे, त्र्यंबक मुळे, संजय होगे , रमेश साठे, सखाराम चव्हाण, अकूंशराव चव्हाण,वसंतराव देशमूख , विठ्ठलराव नारळे, सतीषराव चव्हाण, रेखा चव्हाण, वशिष्ठ रासवे, उध्दवराव शिंदे पाटील, सदाशिव दादा भोरकडे, माणिकराव चौखट, ज्ञानोबा शिंदे पाटील यांच्या सह मानवत तालूक्यातील शेतकरी बांधव यांच्या अवकाळीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.