ताज्या घडामोडी

मराठी अपडेट कृतज्ञता पुरस्काराने ॲड.दिलीप ठाकूर सन्मानित

दिलीप ठाकूर ठरले ८४ पुरस्काराचे मानकरी

नांदेड (प्रतिनिधी) – मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने मराठी अपडेट माध्यम समूहाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा, मराठी अपडेट कृतज्ञता पुरस्कार देवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान गोदाकाठचे सेवाधर्म जोपासणारे तपस्वी व्यक्तीमत्व असलेले दिलीप ठाकूर यांना सामाजिक क्षेत्रातील मराठी अपडेट कृतज्ञता पुरस्कार, जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते देण्यात आला. या पुरस्कारानंतर दिलीप ठाकूर तब्बल ८४ पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.

सेवाधर्म हाच मानवी धर्म समजून समाजातील गोरगरीब, अनाथ, वेडसर, लोकांसाठी भाऊंचा डबा, चरणसेवा, मायेची उब, कायापालट, सेवा ही संघटन, भाऊचा माणुसकीचा फ्रिस, कृपाछत्र, उन्हाळ्यात पानपोई, रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम आदी सामाजिक उपक्रमासह इतर समाज उपयोगी उपक्रम जसे की नरेंद्र देवेंद्र महोत्सव, बहना भाग मत जाना, अमरनाथ यात्रा, गोदावरी गंगापूजन, मोठ्या पडद्यावर क्रिकेट स्पर्धा दाखवणे, राष्ट्रभक्ती चित्रपट मोफत दाखवणे, आदी उपक्रम दिलीप ठाकुर हे राबवत आले आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने मराठी अपडेट माध्यम समूहाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा, मराठी अपडेट कृतज्ञता पुरस्कार देवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान दिलीप ठाकूर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून, यांना सामाजिक क्षेत्रातील मराठी अपडेट कृतज्ञता पुरस्कार जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते देण्यात आला आहे. यावेळी मराठी अपडेट माध्यम समूहाचे संपादक बापूसाहेब पाटील, एकवृत्तचे संपादक दिगांबर शिंदे उपस्थित होते. या पुरस्कारानंतर दिलीप ठाकूर हे तब्बल ८४ पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. आजवरच्या पुरस्कारामध्ये महाराष्ट्र रत्न, मराठवाडा भूषण, कर्मयोगी, दीनबंधू सेवा पुरस्कार, नांदेड के सांता, शान ए नांदेड, इन्स्पायर पर्सनालीटी, आदर्श शिवसैनिक पुरस्कार, राजपूत भूषण पुरस्कार, माँ जिजाऊ रत्न पुरस्कार, समाज विभूषण पुरस्कार, राजे छत्रपती शिवाजी सेवाभाई पुरस्कार, मातोश्री गंगूताई पुरस्कार, जीवन साधना पुरस्कार, भगत नामदेव लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड, अन्नपूर्णा प्रेरणा रत्न पुरस्कार, कानडा राजा पंढरीचा राष्ट्रीय कृपा पुरस्कार, तिरंगा गौरव पुरस्कार, लॉयन्स बेस्ट प्रोजेक्ट इंटरनॅशनल अवार्ड, कृतज्ञता सेवेचा पुरस्कार, राजरत्न पुरस्कार, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता आदीसह इतर पुरस्काराचा समावेश आहे. कोरोना लॉकडाउनच्या काळातील केलेल्या कामाची दखल घेऊन २२ संस्थांनी कोरोना योद्धा हा पुरस्कार देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे यातील १६ संस्था मुंबई, पुणे तसेच महाराष्ट्र बाहेरच्या आहेत.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.