राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी सत्यम पांडे आणि अविनाश धनगर यांची निवड
निफाड ..टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व धाराशिव टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवी सब ज्युनिअर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धा के ,के. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज येथे उत्साहात संपन्न झाली त्यामध्ये नाशिक स्पिरिट स्पोर्ट्स अकॅडमी नाशिक चे खेळाडू सत्यम पांडे व अविनाश धनगर आणि ओम किरण कर्डिले याची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पाचवी जुनियर राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धा ही नाशिक येथे उत्सव संपन्न होणार या स्पर्धेसाठी भारतातून 21 राज्यांचा सहभाग नोंदवणार आहे या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी ,सत्यम पांडे आणि अविनाश धनगर याची महाराष्ट्र संघामध्ये ऑलराऊंडर म्हणून निवड करण्यात आली आहे. सत्यम पांडे यांनी राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन स्वर्ण एक सिल्लोड मॅडम मिळवलेले आहे तसेच अविनाश धनगर याने पण सुवर्णपदकाची कामगिरी केलेली आहे ।सत्यम आणि अविनाश याची नाशिक येथे होत असलेल्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र वुमन डायरेक्टर धनश्री गिरी ,, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड,. धनंजय लोखंडे,, विलास गिरी , पालक किरण कर्डिले
संजय धनगर, नागेंद्र पांडे,यांनी अभिनंदन केले व पुढील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या