https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एकल वापराच्या प्लास्टिकवर मानवत नगर पालिके कडून बंदी जाहिर सापडल्यास दंडात्मक कारवाई , होणार मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे*

२५ ऑक्टोम्बर पासून होणार कारवाई

मानवत / प्रतिनिधी.

मानवत नगर पालिकेने शहरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी त्यांच्याकडे असलेला सिंगल यूज प्लास्टिकचा साठा असल्यास तो साठा येत्या मंगळवार पर्यंत नष्ट करावा. त्यानंतर २५ ऑक्टोबर पासून नगर पालिका कडक पाऊल उचलत दंडात्मक कारवाई करणार आहे, असा ईशारा मुख्यधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी दिला.
सविस्तर वृत्त असे की,
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने १२ ऑगस्ट २०२१ रोजी याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार एक जुलै २०२१ पासून सिंगल यूज प्लास्टिकचे (एकल वापर प्लास्टिक) उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी करण्यात आली आहे.
सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६ ४ (२) नुसार १ जुलै २०२२ पासून पॉलिस्टिरिन आणि विस्तारित पॉलिस्टिरीनसह विविध प्रकारच्या सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घाण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सिंगल यूज प्लास्टिक वापरताना आढळल्यास पहिला गुन्हा म्हणून *५* हजार रुपये दंड केला जाणार आहे. दुसरा गुन्हा घडल्यास *१०* हजार रुपये दंड केला जाणार आहे. तिसरा गुन्हा घडल्यास *२५* हजार रुपये दंड आणि *३* महिने कारावासाची शिक्षा ठोठवली जाणार आहे.
मानवत नगर पालिका क्षेत्रातील व्यापारी बंधू व सूज्ञ नागरिकांनी व सर्व संबंधितांनी सिंगल यूज प्लास्टिकचा साठा असेल नष्ट करावा असे आवाहन मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी केले आहे.
येत्या २५ ऑक्टोम्बर पासून मानवत नगर पालिका दंडात्मक कारवाई सुरू करणार आहे, असा ईशारा मानवत नगर पालिका प्रशासनाच्या वतीने मूख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी दिला आहे.

*[चौकट ]….*

*शहरात या प्लास्टिकच्या साहित्यावर असेल बंदी*

प्लास्टिकच्या कांड्यांसह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, कँडी, कांड्या, प्लास्टिकच्या कांड्या, सजावटीसाठी प्लास्टिकचे आणि पॉलिस्टिरीन (थर्माकोल) चे साहित्य , प्लेटस्, कप्स, ग्लासेस, कटलरी, चमचे, चाकू, पाण्यासाठी स्ट्रॉ, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटच्या पाकिटाभओवती प्लास्टिक फिल्म गुंडाळणे किंवा पॅक करणे, प्लास्टिकचे पीव्हीसी बॅनर (१०० मायक्रॉन पेक्षा कमी) , सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्ज) , सर्व प्रकारच्या नॉन ओव्हन बॅग्ज , हॉटेल मध्ये अन्न पदार्थ पॅकिंगसाठी वापरले जाणारे बाउल, कन्टेनर (डबे), डिश

****

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704