https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

कापसाला बोंडेच आली नाहीत ; बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनी व विक्रेत्या वर कायदेशीर कडक कारवाई करा.

तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे शेतकऱ्यांची मागणी

मानवत / प्रतिनिधी.

बोगस बियाणे विक्री करून शेतक ऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बियाणे कंपनी व संबंधित विक्रेत्यावर तात्काळ कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी देवलगांव आ. येथील शेतकरी विठ्ठल बापु आवचार व महादेव पांडुरंग आवचार यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे. या दोन्ही शेतकऱ्यांची शेती मानवत तालुक्यातील मौ. कोल्हावाडी शिवारात गट क्रं. १०८ मधे असून त्यांनी त्यांच्या शेतातील १२ एकर मध्ये कापसाची लागवड केली आहे. त्यावर मोठा खर्च करून आता पर्यंत त्यांनी दोन ते तीन वेळेस फवारणी केली आहे परंतु अद्याप या कापूस पिकास कोण त्याही प्रकारचे बोंडेच लागली नाही यामुळे या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकऱ्यावर विविध अस्मानी संकटा बरोबरच सुलतानी संकटात सापडला असून त्यातच अशी बोगस बियाणे निघत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच असाच प्रकार तालुक्यातील मौ. हटकरवाडी येथे घडला आहे येथील शेतकऱ्याने मोठा खर्च करत तीन एकर मध्ये सोयाबीन पिकाची पेरणी केली होती त्यावर विविध खर्च केला परंतु ९० दिवसा पेक्षा अधिक कालावधी लोटला गेला तरी त्याच्या सोयाबीन पिकास कुठल्याच प्रकरचा शेंगा लागल्या नसल्याचे आढळून आले त्यामुळे बोगस बियाणाची विक्री तालुक्यात जोमाने वाढली असून याकडे कृषि विभागाने लक्ष देण्याची गरज आहे असे शेतकऱ्यामधून बोलले जात आहे.

बोगस बियाणाचा वाढल्या तक्रारी…..
गेल्या महिन्यातच बोगस सोयाबीन बियाणे आढळून आल्याची तक्रार हटकरवाडी येथील शेतकरी शेख अन्वर शेख रुस्तम यांनी कृषि विभागा कडे केली असून असाच प्रकार कोल्हावाडी येथील घडला असून महादेव आवचार व विठ्ठल आवचार यांनी कापुस लागवड केलेली असता त्यांची हि बोगस बियाणे निघाली असल्याने असा बोगस बियाने कंपनी व बोगस बियाने विक्री कारणाऱ्यावर कृषि विभागाने कायदेशीर कारवाई करने गरजेचे आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704