दिव्यांगांच्या दारी अभियान फिक्स* *काही कारणास्तव कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. जिल्हा समाज कल्याण अधिकारी
–
नांदेड दि. ९ ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी केली होती मात्र काही कारणास्तव ११ आक्टोबर रोजीचा हा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असला तरी दिव्यांगांना विविध शासकीय योजनेचा लाभ ,रोजगाराच्या संधी उपलब्द करून देणारा कार्यक्रम फिक्स असून याबाबतची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या वतीने जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार यांनी कळविले आहे.
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानाची जय्यत तयारी सुरू असून या अभियानात दिव्यांगाकडे नसलेल्या किंवा प्रलंबित असलेल्या सर्व प्रमाणपत्राचा निपटारा एकाच छता खाली करण्यात येणार आहे. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानातंर्गत दिव्यांग व्यक्तीशी संबंधित सर्व योजना या अभियानांतर्गत जिल्ह्यातील नियोजित शिबिरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच संजय गांधी निराधार योजना, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, मतदार नोंदणी, दिव्यांगांना युडीआयडी कार्ड वितरण, दिव्यांगांसाठी नवीन शिधा पत्रिका, दिव्यांगांना रोजगाराच्या संधी, बँकेतील कर्ज प्रकरणे, रोजगार नोंदणी आदींचा लाभ पात्र दिव्यांगाना व्हावा असा या अभियानाचा हेतू आहे.