ताज्या घडामोडी

मनाची भाषा ऐकू येणे म्हणजेच संवेदनशीलता* – सुप्रसिद्ध कवी श्री. राजेसाहेब कदम

*
नांदेड:( दि.९ मार्च २०२५)
जी समजण्यापूर्वी संवाद साधते; तिला कविता म्हणतात. धनाची भाषा तर प्रत्येकालाच ऐकू येते, मनाची भाषा ऐकू येणे म्हणजेच संवेदनशीलता. जे आपल्या आतून उगवून येते; तेच दागिने लेवावे आणि रुजवावे; असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी श्री.राजसाहेब कदम यांनी केले.
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात ‘यशवंत युवक महोत्सव:२०२५’ समारोप सोहळा व बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी दि. ८ मार्च जागतिक महिला दिनी ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर सोहळ्याचे अध्यक्ष संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य व संस्थेचे कार्यकारणी सदस्य श्री.नरेंद्र चव्हाण, माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे,डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रा.कबीर रबडे, युवक महोत्सव समन्वयक डॉ. एम.एम.व्ही.बेग यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.नरेंद्र चव्हाण यांनी, जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देताना पुढील घटना शेअर केली, देशातील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांना एकाने प्रश्न विचारला की, तुम्ही नेहमी कॉमन मॅनचे व्यंगचित्र काढता, कॉमन वूमनचे का नाही? आर. के.लक्ष्मण यांनी उत्तर दिले, वुमन आर नॉट कॉमन; एवरी वुमन इस स्पेशल. प्रत्येक महिला ही विशेष असते. पुढे बोलताना ते म्हणाले की, येणाऱ्या काळात महिलांचे जीडीपी १८% होणार आहे. इतर देशात मात्र ते ४८% आहे. महिलांना विकासाची खूप संधी उपलब्ध आहे. युवकांच्या बेरोजगारीवर मत व्यक्त करताना ते म्हणाले, मुलांनी शेती क्षेत्राला करिअर मानून कार्य करावे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा. तसेच नवोपक्रमाचे व्यावसायिकतेमध्ये रूपांतर व्हावे.
प्रारंभी प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, युवकांसाठी व्यक्तिमत्व विकास आवश्यक बाब आहे. २०१९ पासून स्नेहसंमेलनास सामाजिक व संशोधकीय आयाम प्राप्त झाला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावे, हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. रावसाहेब शेंदारकर म्हणाले की, स्नेहसंमेलनाद्वारे वक्तृत्व, व्यवहार आणि आचरणाची बांधणी होते. तरुणाईचे भवितव्य विविध स्पर्धा आणि शैक्षणिक उपक्रमातून घडत असते. हिऱ्यास कंगोरे दिल्यास तो मूल्यवान बनत असतो, त्याचप्रमाणे युवकांच्या व्यक्तिमत्त्वाला शैक्षणिकतेचे कंगोरे दिल्यास तो मूल्यवान बनत असतो.
सोहळ्याचे सुरेख काव्यमय सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख महानुभाव पंथाचे सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.संजय जगताप यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा.राजश्री भोपाळे यांनी करून दिला आणि शेवटी आभार डॉ. एम.एम.व्ही. बेग यांनी मानले.
श्रीकांत गायकवाड या विद्यार्थ्याने प्रमुख अतिथी, मा.प्राचार्य, मा.उपप्राचार्य आणि इंग्रजी विभागप्रमुख डॉ.एल. व्ही. पदमाराणी राव यांचे तात्काळ पेन्सिलने उत्कृष्ट स्केच काढल्याबद्दल प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. युवक महोत्सवानिमित्त आयोजित स्पर्धांचे बक्षीस वितरण सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, अविष्कार युवक महोत्सव पुरस्काराचे प्रा.भारती सुवर्णकार, राष्ट्रीय छात्र सेना लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर आणि प्रा.प्रियंका सिसोदिया, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. कैलास इंगोले आणि डॉ.संजय जगताप,कनिष्ठ महाविद्यालय क्रीडा विभाग प्रा.उत्तम केंद्रे आणि प्रा. भोसकर, वरिष्ठ महाविद्यालय क्रीडा विभाग डॉ. मनोज पैंजणे आणि सांस्कृतिक विभागातील गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सूत्रसंचालन प्रा.संगीता चाटी आणि विभागप्रमुख डॉ. शिवदास शिंदे यांनी केले.
सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समारोप सोहळा समिती समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ. शिवराज शिरसाठ, डॉ.शिवाजी सूर्यवंशी, प्रमाणपत्र वितरण समिती समन्वयक डॉ.श्रीकांत जाधव, डॉ.प्रवीण तामसेकर, डॉ.पी.बी.पाठक, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, रंगनाथ जाधव, के.एस.इंगोले, गोविंद शिंदे, डी.आर.टरके, एम.आर. कल्याणकर, बी.एल. बेळीकर, लेखा विभागातील अभय थेटे, जगन्नाथ महामुने, पोशट्टी अवधूतवार, आनंदा शिंदे, नाना शिंदे, श्री. डाखोरे, गणेश विनकरे आदींनी केले. याप्रसंगी वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.