महिला दिनानिमित्त स्त्रीरोग वैद्यकीय संघटनेच्या वतीने स्त्री जनजागृती रॅलीचे आयोजन

नांदेड(प्रतिनिधी):
८ मार्च हा दिवस महिलासाठीचा खास दिवस असतो.
या दिवशी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान स्त्रियांचा सन्मान केला जातो. आजच्या काळातील अबला स्त्रियांचे सबलीकरण करणे ,स्त्री शिक्षण,आणि आरोग्य विषयक जनजागृती एकूणच स्त्रीच्या कुटुंबातील व समाजातील स्थान उंचावण्यासाठी त्या गोष्टीचे महत्त्व पुरुषप्रधान संस्कृतीला पटवून देण्यासाठी हा दिवस संपूर्ण स्त्रियांसाठी जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने स्त्रीरोग वैद्यकीय संघटना महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडच्या स्त्री रोग वैद्यकीय संघटनेतर्फे ८ मार्च रोजी अत्यंत उत्साह आणि जल्लोष वातावरणात सकाळी आठ वाजता स्त्री जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व निष्णात स्त्रीरोग डॉ. महिला डॉक्टर या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीची सुरुवात घोषणा देत आयुर्वेदिक कॉलेज नांदेडच्या गेट समोरून सुरुवात झाली, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शासकीय व खाजगी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर महिलांनी संपूर्ण शक्ती अभियानांतर्गत महिला आरोग्य व सबलीकरण या संदर्भात स्त्रियांच्या उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
या संघटनेच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष डॉ.मेघक्षी देशमुख काहळेकर ,उपाध्यक्ष डॉ. मीनल पाटील सचिन ,डॉ. प्रांजली जोशी, यांच्या नेतृत्वात सदरील रॅली डॉक्टर लेन ते आंबेडकर पुतळामार्गे शिवाजी पुतळा व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय काढण्यात आली.रॅलीचा समारोप झाला. नांदेड मधील नामवंत स्त्री रोग तज्ञ डॉ. सारिका झुंजारे, डॉ. मीना धोंडगे, डॉ. सुचिता पेकमवार, डॉ.सेजल महाजन, डॉ. विजया जाधव, डॉ, तृप्ती हुनडीवाला, डॉ.पल्लवी तुंगिनवार डॉ. भाग्यश्री सोनी, डॉ. अनघा घई, डॉ, प्रियंका पावडे डॉक्टर भाग्यश्री रायसोनी, डॉ. प्रिया बुरांडे, डॉ.मनीषा मुंडे इत्यादी डॉ. मंडळी व पॅरामेडिकल स्टाफची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकारी यांना स्त्रियांच्या आरोग्य व इतर मागण्या संदर्भात निवेदन देऊन रॅलीची सांगता करण्यात आली.