https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आरोग्य व शिक्षण

वसंतराव नाईक महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा

नांदेड. दि.२१. (संपादक राज गायकवाड)
श्री. सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने हिंदी दिवस साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून कनिष्ठ महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रा. बी. बी. बद्रवाल यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगून संत परंपरा , प्रेमचंद च्या साहित्यामधून समग्र भारताच्या ग्रामीण जीवनाचे दर्शन होते. तर हिंदी भाषा ही जगातील चौथी प्रसिद्ध भाषा आहे
असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात बोलताना
प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार म्हणाले की वैश्विक स्तरावर हिंदी भाषेचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात आहे.
हिंदी भाषेने अनेक शब्दांना आत्मसात करून समृद्ध बनली आहे. त्यामुळे हिंदी भाषा ही विविधतेमध्ये एकतचे सूत्र निर्माण करते. असे अध्यक्षीय समारोपात मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपप्राचार्य
डॉ.व्ही. आर.राठोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एन.पी.दिंडे यांची उपस्थिती होती. यावेळी या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व असंख्य विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शेख बुशरा मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. कपिल हिंगोले यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704