ताज्या घडामोडी

पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 29 व 30 सप्टेंबर रोजी आयोजन

*

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 29 व 30 सप्टेंबर रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar@gmail.com किंवा 02462 (251674) व योगेश यडपलवार 9860725448 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्याकडून मुलाखत घेण्यात येणार आहेत. बेरोजगार उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नाव नोंदणी करावी. उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करुन घेता येईल. या संधीचा लाभ जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी घ्यावा, असेही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविले आहे.

आर्यन असेथिंटीक प्रा.ली या कंपनीत टेलर 10 रिक्त पदासाठी इयत्ता 10 वी पास/नापास स्त्री/पुरुष उमेदवारांची भरती करावयाची आहे. नवकिसान बायो प्लानेटिक लिमिटेड या कंपनीत सेल्स रिप्रझेंटिव्ह या 30 रिक्त पदासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी 12 वी, पदवीधर असून वय 21 ते 35 वर्षाच्या उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. लाईफ इन्सुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीत लाईफ इन्सुरन्स ॲडव्हायझर 42 रिक्त पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 वी 12 वी, पदवीधर आहे. तरी बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.