https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत महाविद्यालय हेच माझे माहेर – डॉ.जगदीश कदम

नांदेड : (दि.२७ सप्टेंबर २०२३)
यशवंत महाविद्यालयामध्ये मी अनेक वर्ष अध्यापनाचे कार्य केले. मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाल्यानंतर महाविद्यालयाकडून हा सत्कार स्वीकारताना आपल्या माहेरी आल्याचा अनुभव मला येत आहे.आज मूल्यांची प्रचंड प्रमाणात पडझड होत असताना एका विचित्र कालखंडातून आपण जात आहोत.पूर्वी ज्ञानसत्तेचा आदर केला जात असे.आज धर्मसत्ता प्रबळ झालेली आहे. विशिष्ट मुहूर्त पाहून संसदेत प्रवेश केला जात आहे. विज्ञाननिष्ठ समाजासमोर हे फार मोठे आव्हान आहे; तरूणाईने हे आव्हान परतवून लावायला हवे; असे उद्गार ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ जगदीश कदम यांनी व्यक्त केले .
गंगापूर येथे होणाऱ्या ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक तथा यशवंत महाविद्यालयाचे माजी विभागप्रमुख डॉ. जगदीश कदम यांची निवड झाल्याबद्दल यशवंत महाविद्यालयातील मराठी विभागाकडून सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,शाल, पुष्पहार,ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, डॉ.जगदीश कदम यांच्या यशवंत महाविद्यालयातील कारकीर्दीबद्दल गौरव उद्गार काढले. शेतकरी जीवनाशी एकरूप होऊन त्यांनी जे लेखन केले आहे; ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे दुःख मांडणारे आहे; असे ते म्हणाले.
याप्रसंगी धनवटे नॅशनल महाविद्यालय, नागपूरचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.पी.एस. चांगोले, विज्ञान महाविद्यालय, नागपूरचे प्राचार्य डॉ.महेंद्र ढोरे, मराठी विभागप्रमुख डॉ.संजय जगताप, डॉ.विश्वाधार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना डॉ. जगदीश कदम पुढे म्हणाले की, जवळपास ३५ वर्ष यशवंत महाविद्यालयामध्ये मी अध्यापनाचे कार्य केले. मला सक्षमपणे उभे करण्यात यशवंत महाविद्यालयाचा मोलाचा वाटा आहे. माझी ओळख यशवंत महाविद्यालयामुळे निर्माण झालेली आहे. त्यामुळे यशवंत महाविद्यालयाकडून सत्कार स्वीकारताना मला माहेरी आल्याची अनुभूती येत आहे.
अध्यक्षीय समारोपात माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर यांनी, डॉ. जगदीश कदम यांच्या साहित्य लेखनाबद्दल महत्त्वपूर्ण विचार मांडले. एका शेतकऱ्याचा मुलगा किती उंची गाठू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. जगदीश कदम आहेत; असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवाजी सूर्यवंशी यांनी केले तर आभार मराठी विभाग प्रमुख डॉ.संजय जगताप यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत मुंगल यांनी परिश्रम घेतले.
यावेळी प्रा.कैलास दाड, प्रा.मधुकर वाघ, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, डॉ.विजय भोसले, डॉ. संभाजी वर्ताळे, डॉ.सुभाष जुन्ने ,डॉ. अजय गव्हाणे आणि विद्यार्थी विद्यार्थिनींची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704