महाराष्ट्र

सदृढ मानसिक आरोग्य आणि ताणतणाव व्यवस्थापनावर” मार्गदर्शन

नांदेड, (mcrnews) दि. 5:- शासकिय तंत्रनिकेतन नांदेड येथे दिनांक ०५ नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सामुदायिक जागृती मोहिमेअंतर्गत जिल्हा आरोग्य रुग्णालय नांदेड च्या सहकार्याने “सदृढ मानसिक आरोग्य आणि ताणतणाव व्यवस्थापनावर” मार्गदर्शन करण्यात आले. प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर शाहू शिराढोणकर यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करता येईल याबाबत माहिती दिली.नकारात्मक बाबी दूर करून सकारात्मक कसे होता येईल याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुधा टेकुळे, समुपदेशक, यांनी आई-वडिलांच्या अपेक्षा, अभ्यासाचे ताणतणाव इत्यादी गोष्टींची नियोजन कसे करावे यावर भर दिला. अपयश, यश पचविण्याची मानसिक तयारी कशी करावी हे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी अपेक्षा आणि वास्तविकता यामधील फरक विद्यार्थ्यांना समजून सांगितला. मोबाईलच्या अतिवापरामुळे व्यक्ति—व्यक्तिमधील,आप्तस्वकीया मधील प्रत्यक्ष संवाद तुटला आहे. हा संवाद वाढवण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा . आपल्या पालकांसोबत बोलते व्हावे याबद्दल त्यांनी यावेळी सांगितले.

संस्थेतील अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. सदरील कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी श्री ए .एन. यादव, सहाय्यक श्रीमती ज्योतीका बघाटे, श्री सरोदे सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे शेवटी श्री .ए .एन. यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button