https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण; प्रश्न मांडण्यासाठी खा.चिखलीकरांचे पत्र

उपोषणार्थी दता पाटील हडसणीकर यांची थेट संवाद

नांदेड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. त्या समर्थनार्थ हडसणी (ता.हदगाव) येथील दत्ता पाटील हडसणीकर सलग सहा दिवसांपासून उपोषण करत असून त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे दाखल केले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण प्रश्न मांडण्या बाबत पत्र दिले आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या बाबत सकारात्मक निर्णय घेत आहेत. तेव्हा आपण उपोषण मागे घ्यावे असा थेट संवाद जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दता पाटील हडसणीकर यांच्याशी साधला आज भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्या प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या तब्येतीच विचारपूस केली सरकार आरक्षण देण्यास लवकरच निर्णय घेतील असा विश्वास व्यक्त केला.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत आहे. तर दुसरीकडे त्याच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून गेल्या सहा दिवसांपासून दता पाटील हडसणीकर आमरण उपोषण करत आहेत. त्यांनाही विष्णुपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज शुक्रवारी प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी विष्णुपुरी येथे जाऊन त्यांची भेट घेतली आस्थेवाईकपणे विचारपूस केले. त्यावेळीच जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दत्ता पाटील हडसणीकर यांच्याशी मुंबई येथून फोनवर सकारात्मक संवाद साधला. संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण प्रश्न मांडण्यासाठी आपण पत्र दिले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ मराठा आरक्षणासाठी कटीबद्ध असून दत्ता पाटील हडसणीकर यांना उपोषण मागे घेण्याची विनंती खा.चिखलीकर यांनी केली.
यावेळी शासकीय मेडिकल कॉलेज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे, भाजपा युवा मोर्चा महानगराध्यक्ष संजय पाटील घोगरे, नांदेड भाजपा दक्षिण तालुकाध्यक्ष सुनील मोरे, सामाजिक कार्यकर्ते श्याम पाटील वडजे, पत्रकार संग्राम मोरे, अनिल मोरे, सुधीर हंबर्डे, पप्पू पावडे, डॉ.मनूरकर, सुमित जोशी, रवी घुले यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704