https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

ओशो कम्यूनमध्ये महापरिनिर्वाण दिन महोत्सवाचे आयोजन

नांदेड:( दि.७ सप्टेंबर २०२३)
ओशो ब्लेसींग्ज मेडिटेशन इंटरनॅशनल कम्युन येथे दि.८ सप्टेंबर २०२३, शुक्रवार रोजी महापरिनिर्वाण दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ओशोंचे वडील स्वामी देवतीर्थ भारती यांचा निधन दिवस ओशोंच्या सांगण्याप्रमाणे महापरिनिर्वाण दिन उत्सव साजरा करण्यात येतो. याच दिवशी भूतकाळात निधन पावलेल्या व समाधी अवस्थेस उपलब्ध ओशो संन्यासींचा देखील महापरिनिर्वाण साजरा केला जातो.
या एक दिवसीय शिबिराचा प्रारंभ स.८ वाजता होईल आणि संध्या. ०६:३० वाजता संध्या सत्संगने समारोप होईल. या शिबिराचे संचालन प्रत्यक्ष ओशोद्वारे संन्यासीत स्वामी गोपाळ भारती, राजस्थान हे करणार आहेत. शिबिरात सक्रिय ध्यान, कीर्तन ध्यान, कुंडलिनी ध्यान, पेंटिंग मेडिटेशन, वर्क मेडिटेशन, स्टॉप मेडिटेशन सायलेंट सिटिंग आदी ध्यान प्रयोग संपन्न होणार आहेत.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्वामी प्रेम प्रशांत, मा प्रेम सुगंधा, मा वंदना, स्वामी गुरुमुख भारती, मा प्रेम संगीता, मा गुरु दर्शना, स्वामी आनंद सुरेश, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.हनुमंत भोपाळे, कैलास बळवंत, सुनील नेरळकर, गणेश पापणवार, प्रा.मोहन वडजकर आदी सहकार्य करीत आहेत.
—————

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704