https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

ताडबोरगाव येथे तालुकास्तरीय शिक्षण परिषद संपन्न* > शिक्षण परिषदेस शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसा

_________________________________

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मौ. ताडबोरगाव येथे ०६ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण परिषदेस उपस्थित राहण्यासाठी शिक्षकांचे आगमन सुरु झाले असता उपस्थिती घेण्याचे कार्य शिक्षिका श्रीमती कुसुम कच्छवे, शिक्षक दत्ता सहाणे, विलास राठोड, बालाजी कवडे, संतोष पांचाळ, सुजाता वाघमारे, राजकुमार गाडे यांनी चोख पार पाडले. त्यानंतर शिक्षकांची गट निहाय आठ गटात विभागणी केली. अतिशय नियोजन बद्ध शिक्षकांना प्रेरीत करून गटकार्य व सप्टेंबर महिन्याचे अध्ययन निष्पत्ती वर आधारित घटक नियोजन करुन घेतले. वर्ग १ ली साठी सुलभक म्हणून कल्पना कानडे, वर्ग २ री साठी सावित्री पांडुळे, वर्ग ३ री साठी परमेश्वर सिराळ, वर्ग ४ थी साठी शंकर सिराळ तर वर्ग ५ वी साठी संगिता पाटील यांनी तर ६ वी ते ८ वी साठी विषय निहाय सुलभक म्हणून मराठी विजय जल्लारे, इंग्रजी विषयासाठी अल्का सातपुते, हिंदी विषयासाठी एस. के. सोनटक्के, गणित विषया साठी सागर देवकर, विज्ञान विषया साठी अमोल तापकीर, सा.शास्त्र विषयासाठी हरिभाऊ जोशी यांनी तसेच माझी शाळा समृद्ध शाळा बलभीम माथेले, पालक सभेचे शाळेच्या विकासात महत्व यावर रामराव सोळंके यांनी महत्व विषद केले. तर दुसऱ्या सत्राची सुरुवात विद्येची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या व भारतीय संविधानाच्या पुजनाने झाली प्रतिमा व सविंधान पुजनाचा मान वाचन चळवळीचे विनोद शेंडगे, श्रीमती. अनिता खरात व पुरी सरांना त्यांच्या विशेष कार्यामुळे मान्यवरांनी दिला. यावेळी व्यासपीठावर परभणी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी योजना मा. संजयजी ससाणे, उप शिक्षणाधिकारी प्रा. मा. शौकतजी पठाण, मानवतचे गटशिक्षणाधिकारी मा. डी. आर. रणमाळे, मानवत केंद्र प्रमुख शिरीष लोहट, मंगरूळ बु. चा केंद्रप्रमुख श्रीमती. माया जानराव, केकरजवळा केंद्र प्रमुख कान्हू लहिरे, कोल्हा केंद्रप्रमुख प्रकाश मोहकरे, शाळेचे मुख्याध्यापक अनिल सावळे, जमिल रंगरेज, विलास लांडगे यांची उपस्थिती होती माझी शाळा, समृद्ध शाळा या ताडबोरगाव शाळेच्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांना “शिक्षण” हे पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले वर्ग डिजिटल केल्याबद्दल वर्गशिक्षक जुन्नेद व मजीद कौतुक करून शुभेच्छा दिल्या. शिक्षणाधिकारी शौकत पठाण यांनी आपल्या विषयाच्या ज्ञानरचनावाद, वर्तनवाद, अध्ययन निष्पत्ती, सुक्ष्म अध्ययन निष्पत्ती यासह विविध विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी करून सर्व शिक्षकांना कार्यप्रवण केले. समारोप प्रसंगी आपल्या चिरपरिचित अंदाजात संजय ससाणे यांनी विविध विषयांवर चर्चा घडवून आणली व सर्व शिक्षकांसोबतच पर्यवेक्षिय यंत्रणेला आपल्या कार्याची जाणीव करून देत कार्य करण्यासाठी प्रेरीत केले व एक नवसंजीवनी दिली. गटशिक्षणाधिकारी मा.डी. आर. रणमाळे यांनी पुढील नियोजन देऊन व आभार व्यक्त केले. ही शिक्षण परिषद यशस्वी करण्या साठी ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक श्री. अनिल सावळे, जमील रंगरेज, बलभीम माथेले, जुन्नेद सर, नरेंद्र कांबळे, श्रीमती. नंदा शिंदे, सारिका करंडे, स्वाती कुकडे, श्रीमती. प्रधान, श्रीमती. कौसर, श्रीमती. रुक्सना, श्री. माजीद, श्री. कलीम, श्री. जुन्नेद यांनी प्रयत्न केले.

*सर, शाळेची महत्वपूर्ण बातमी आहे. फोटोसह घेण्याची कृपा करावी.सर.*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704