https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत ईरळद जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे यश* > यशस्वी विद्यार्थ्यांची तालुका स्तरा वरून जिल्हा स्तरावर निवड

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. ईरळद जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुका स्तरीय योगासन स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. मानवत शहरातील श्रीमती शकुंतला बाई कांचनराव कत्रुवार विद्यालयात ०६ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी चि. युवराज मुंजाभाऊ लंगोटे १४ वर्ष वयोगटातील प्रथम तर इयत्ता ०९ वी मधील विद्यार्थीनी कु. जना आसाराम दुधे १७ वर्ष वयो गटातील प्रथम आणि कु. गायत्री माणिक महाजन इयता ०७ वा यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन प्रदर्शन सादर करत नेत्रदिपक यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांने नाव लौकिकाला साजेशी अशी कामगिरी करून दाखवली असून अल्पावधीतच विद्यार्थ्यांनी तयारी करून अप्रतिम असे योगासने व प्रदर्शन तालुका स्तरावर सादर करून दाखवले व त्यांची निवड आता जिल्हा स्तरावर झाली आहे.
यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिंगाबर भिसे, योगा शिक्षक श्री. गिरी यांनी विद्यार्थ्यांची तयारी करून परिश्रम घेतले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्यध्यापक तसेच शालेय व्यवस्थापन समिती आणि सन्मानिय ग्राम पंचायत सदस्य यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाट चालीस या वेळी मान्यवरांच्या वतीने या वेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704