https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत ‘ चे विविध विषयात विद्यापीठ गुणवत्ता यादीत देदीप्यमान सुयश

नांदेड:(दि.२९ ऑगस्ट २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उन्हाळी २०२३ परीक्षेतील विविध विषयात एकूण २४ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत प्रथम, द्वितीय किंवा तृतीय येण्याचा बहुमान पटकाविला आहे.
विविध क्षेत्रात यशाची उत्तुंग उंची गाठणाऱ्या ‘यशवंत ‘ ने याही वर्षी गुणवत्ता यादीत सुवर्णाक्षरांनी नाव नोंदवून इतिहास रचला आहे.
पदवी आणि पदव्युत्तर कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले सुयश ‘यशवंत ‘ च्या मानपेचात तुरा खोवणारे आहे.
बी.एससी. जैवतंत्रज्ञान विषयातील प्रथम कु.शिवानी रमेश कुऱ्हाडे, द्वितीय कु.रसिका रविकांत कदम आणि तृतीय कु.आकांक्षा वामनराव टोम्पे या तीनही विद्यापीठस्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थिनी ‘यशवंत ‘ च्या आहेत तसेच बी.कॉम. शाखेतील प्रथम कु.साक्षी सुहास झमारे, द्वितीय कु.सुनीता सुरेश जोहरी आणि तृतीय कु.दिव्या देवेंद्र टाक या तिन्ही विद्यार्थिनींनी विद्यापीठ गुणवत्ता यादीत अढळ स्थान पटकाविले आहे.

 

.                 आकांक्षा चिनन्ना अडपोड (अर्थशास्त्र)

एम. ए. अर्थशास्त्र विषयातील प्रथम आणि तृतीय गुणवत्ताधारक अनुक्रमे कु.आकांक्षा चिनन्ना अडपोड व कु.निकिता रामराव जाधव या आहेत.पी. जी.टी.पी.पी. या विषयातील प्रथम निळकंठ डिगाजी लांडे आणि द्वितीय कु.क्रांती सुधाकर शिरसाठ यांनी गुणवत्ता यादीत यशस्वीता प्राप्त केली आहे.

एम.एससी. जैवतंत्रज्ञान या विषयात द्वितीय क्रमांक कु.अर्चना सहदेव वडजे व तृतीय क्रमांक कु.पूजा राजेंद्र ठोके यांनी पटकाविला आहे. एम.एससी. रसायनशास्त्र विषयातील तृतीय गुणवत्ताधारक विद्यार्थी विकेश विश्वनाथराव नरवाडे हा आहे. एम.एससी. संगणकशास्त्रात कु. सुमय्या फिरदोस अब्दुल रौफ या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
एम.एससी. पर्यावरणशास्त्र विषयातील तीनही विद्यार्थी ‘यशवंत ‘ चे आहेत. प्रथम कु.संजीवनी दिगंबर कदम द्वितीय शेख हमीद सलमान शेख आणि तृतीय कु.अलंका ज्ञानेश्वर कदम या विद्यार्थिनीने ही यशस्विता प्राप्त केली आहे तसेच एम.एससी. माहिती तंत्रज्ञान विषयातही विद्यापीठस्तरीय तिन्ही गुणवत्ताधारक अनुक्रमे प्रथम विराणी भूषरा मोहम्मद आसिफ द्वितीय रोहित हनुमंतलू भूपटवार आणि तृतीय शोयेन गणेश भटंबरे हे विद्यार्थी आहेत.
एम.एससी प्राणिशास्त्र विषयात कु.जान्हवी रमेश जाधव या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. एम.एससी. इलेक्ट्रॉनिक्स विषयातही तीनही गुणवत्ताधारकतेचा मान ‘यशवंत ‘ ला मिळाला आहे. प्रथम क्रमांक कु. सोफिया तबस्सूम मोहम्मद निसार अहमद, द्वितीय क्रमांक रामकुमार भगवान भोजवानी आणि तृतीय क्रमांक प्राप्त कु. ममशाद खानुम अन्सारखान यांनी विद्यापीठ निकालातील ‘यशवंत ‘ चे निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
या अभिमानास्पद व सर्वव्यापी सुयशाबद्दल सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थी, विद्यार्थिनी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री श्री. अशोकराव चव्हाण, उपाध्यक्ष माजी आमदार सौ.अमिताताई चव्हाण, सचिव माजी पालकमंत्री श्री.डी.पी.सावंत, सहसचिव ॲड.उदयराव निंबाळकर, कोषाध्यक्ष माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर, कार्यकारिणी सदस्य माजी प्राचार्य डॉ.बी.एस.ढेंगळे, श्री. पांडुरंगराव पावडे, कु.श्रीजयाताई चव्हाण, कु.सुजयाताई चव्हाण, सुप्रसिद्ध उद्योजक नरेंद्र चव्हाण आदींनी अभिनंदन केले आहे
——————————————-

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704