नांदेड येथे भूलतज्ञ संघटनेची एकदिवशीय परिषद संपन्न


प्रतिनिधी: नांदेड
नांदेड भूल तज्ञ संघटने तर्फे दिनांक २४ जुलै रोजी भूल तज्ञांसाठीची एक दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन, नियोजन भवन येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी भूल तज्ञ संघटनेचे राष्ट्रीय सचिव डा
डॉ.श्री.सुखमिंदरसिंग बाजवा, राष्ट्रीय संघटनेचे माजी सचिव डॉ.नवीन मल्होत्रा ,संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. मनीषा काटीकर, तसेच महाराष्ट्र राज्य भूलतज्ञ संघटनेचे अध्यक्ष
या परिषदेसाठी खास पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या एक दिवसीय परिषदेमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयावर अनेक तज्ञांची व्याख्याने आणि चर्चासत्र संपन्न झाले.
तज्ञांना प्रत्यक्षात काम करण्यासाठी या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग होतो.
नांदेड भूल तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर सचिव डॉक्टर सचिन चांडोळकर सहसचिव डॉ. सतीश राठोड आणि कोषाध्यक्ष डॉ. सुरेखा साजणे ही कार्यशाळा आणि परिषद आयोजन करण्यामध्ये . मोलाचे योगदान दिले.
नांदेड भूलतज्ञ संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व भूल तज्ञ सदस्यांनी ही परिषद यशस्वी होण्यासाठी हातभार लावला. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.