एम सी आर

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाविन्यपूर्ण अध्यापन आवश्यक – प्र-कुलगुरू डॉ.अशोक महाजन

Uncategorized

नांदेड:( दि. ४ ऑगस्ट २०२६) :
श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या सहकार्याने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: २०२० अंतर्गत बी.एस्सी. तृतीय वर्ष अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी’ या विषयावरील विद्यापीठस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
कार्यशाळेचे उद्घाटक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर भर दिला. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी शिक्षक, महाविद्यालय व विद्यापीठ यांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, पीएम-उषा योजनेअंतर्गत उभारलेल्या आधुनिक सुविधा व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी डॉ. योगेश एस. जोशी, डॉ. एस. यू. आवळे, डॉ. श्रीकांत जी. जाधव व डॉ. वाय. टी. नाखाते यांची प्रमुख उपस्थिती होती. इलेक्ट्रॉनिक्स विभागाने विकसित केलेल्या डिजिटल बुकचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तांत्रिक सत्रांमध्ये डॉ. एस. यू. आवळे व डॉ. जी. डी. कुरुंदकर यांनी संगणकशास्त्र अभ्यासक्रमातील बदल, अभ्यासक्रम परिणाम, प्रकल्प कार्य व मूल्यमापन पद्धती यावर मार्गदर्शन केले. तर इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या सत्रात डॉ. योगेश जोशी, डॉ. एस. के. गोरे, डॉ. आर. एस. कावळे, डॉ. वाय. टी. नाखाते व श्री. डी. एस. दुलेवाड यांनी अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व आवश्यक सॉफ्टवेअरविषयी माहिती दिली.
कार्यशाळेला विद्यापीठ संलग्न विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही कार्यशाळा मार्गदर्शक व उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. संदीप राठोड, डॉ. प्रवीण तामसेकर, डॉ. प्रवीण मिरकुटे, प्रा. संकेत देलमाडे, प्रा. अर्जुन गुरखुदे, डॉ. परम चिकटे, डॉ. पी. बी. पाठक, डॉ. एस. एम. शिंदे तसेच विद्यार्थी स्वयंसेवक ऐश्वर्या हमंद, साक्षी आणि विघ्नेश पतंगे यांनी परिश्रम घेतले तसेच प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिराजदार व गजानन पाटील तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Share

Related posts

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नांदेड प्रशासन सतर्क नांदेड जिल्ह्यात जीवित व वित्तहानी नाही नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री अतुल सावे

Chief Editor

हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी भाविकांना लंगर वाढून केली सेवा

Chief Editor

मराठी रोजगाराभिमुख भाषा -पत्रकार व कथाकार राम तरटे

Chief Editor

ने.सु.बो चा एनसीसी कॅडेट गणेश पिसाळ यांची सी.आर. पी.एफ मध्ये निवड

Chief Editor

इतिहासातील चुका मधून धडा घेतला तर भविष्यकाळ उज्वल ठरतो. प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ४ सप्टेंबर रोजी ‘संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास’ कार्यशाळेचे आयोजन

Chief Editor

Leave a Comment