https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
राजकीय

वाढीव घरटॅक्सच्या जनसूनावणीत वंचित बहुजन आघाडीची धडक

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

        नगर परिषदेद्वारे वाढविलेल्या घरटॅक्स संदर्भाने बोलाविलेल्या जनसूनावणीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिका-यांनी धडक देऊन वाढविलेले मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी लावून धरली असता यावेळी विशेष बैठक घेऊन मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी अवाजवी कर कमी करण्याचे आश्वासन दिले आहे .

       नगर परिषदेने वाढविलेल्या मालमत्ता कराच्या संदर्भाने आक्षेप व हरकती असणा-यांची जनसुनावणी आजपासून नगर परिषदेत घेण्यास सुरुवात झाली असतांना वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनसूनावणीत धडक देऊन अवाढवी वाढवलेले मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी  प्राधिकृत मुल्यांकन अधिकारी अ. म. पार्लेवार यांच्याकडे लावून धरली असता उपस्थित अधिका-यांची बरीच तारांबळ उडाली व शेवटी मुख्याधिका-यांच्या दालनात विशेष बैठक आयोजीत करून वंचित बहुजन आघाडीच्या शिष्ठमंडळाशी सविस्तर चर्चा केली.

     यावेळी बैठकित झालेल्या चर्चेनुसार करयोग्य मुल्यावर आकारलेले २५ टक्के, उपयोगितेवर आकारलेले ७ टक्के, विशेष शिक्षणावर आकारलेले ७ टक्के आदि शुल्क कमी करण्याचे तसेच तयार करण्यात आलेले उच्च वस्ती, मध्यम वस्ती, कनिष्ठ वस्ती  या झोनमध्ये येणा-यां मालमत्ता धारकांची पडताळणी करण्याचे व घरकुल योजने अंतर्गत असणा-या लाभार्थ्यांना विशेष सवलत देण्याचे व अवाजवी असणा-या शुल्कात सुधारणा करण्याचे सुद्धा आश्वासन मुख्याधिकारी पिदुरकर यांनी  दिले.

          विशेष झालेल्या बैठकित मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, वंचितचे जिल्हाध्यक्ष, गडचिरोलीचे माजी सरपंच सदरूभाई नाथानी, मुल्यांकन अधिकारी अ. म. पार्लेवार, उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार,  वंचितचे उपाध्यक्ष जी. के. बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, नगर परिषद विभाग प्रमुख चिचघरे, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, शहर उपाध्यक्ष तुळशिराम हजारे, जिल्हा उपाध्यक्ष भोजराज रामटेके, सोमनाथ लाकडे, रवी निकोडे, मुकेश शेंडे, दिपक कोसमशिले, जानकिराम भुरसे, प्रभाकर जुनघरे, पुरूषोत्तम नंदगिरवार आदि होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704