https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आरोग्य व शिक्षण

दारू पिऊन बेधुंद अवस्थेत रुग्णवाहिका चालवली

ब्रम्हपूरो,प्रतिनिधी :-

मुडझा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहन चालक सुनील मारवाडे हे रुग्णवाहिकेने परत मुडझा येथे घेऊन येत असतांना ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावर भीषण अपघात झाला व ह्या गरीब रुग्णांना गंभीर दुखापत होऊन त्यांना ब्रह्मपुरीत रुग्णालयात उपचारासाठी हलवावे लागले. मुडझा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे वाहन चालक सुनील मारवाडे हे दारू पिऊन बेधुंद अवस्थेत रुग्णवाहिका चालवत होते.

दिनांक १२ डिसेंम्बर २२ सोमवार ला तालुक्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली. ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित हायड्रोसील तपासणी शिबिरात मुडझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने ह्या केंद्राशी संलग्न गावांतील गरीब रुग्णांना शस्त्रक्रिया करून घेण्यास पाठवले होते.  संबंधित रुग्णांची तपासणी झाल्यानंतर त्यांना मुडझा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहन चालक सुनील मारवाडे हे रुग्णवाहिकेने परत मुडझा येथे घेऊन येत असतांना ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावर भीषण अपघात झाला व ह्या गरीब रुग्णांना गंभीर दुखापत होऊन त्यांना ब्रह्मपुरीत रुग्णालयात उपचारासाठी हलवावे लागले. प्राथमिक आरोग्य केंद्र मुडझा येथेच कार्यरत  मिथुन लोखंडे जे आपल्या कर्तव्यावर सोबत रुग्णवाहिकेत होते, ह्यांना जबर दुखापत झाल्याने अत्यवस्थ स्थिती आलेली आहे.

         रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या ह्या वाहनचालकाची ही मद्यधुंद अवस्था ह्यापूर्वी सुद्धा मुडझा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व आशा वर्कर्स ह्यांनी अनुभवली आहे व त्याबद्दल वरिष्ठ स्तरावर तक्रारी झाल्या आहेत, मात्र ह्या वाहनचालक सुनील मारवाडे ह्यांच्यावर प्रशासनाने कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली नाही, त्यामुळे ह्या वाहनचालकाची मग्रुरी वाढत जाऊन ते वारंवार अशा रीतीने मद्यपान करून रुग्णवाहिका चालवतात असा नागरिकांचा आरोप आहे.

जर ह्या वाहनचालक सुनील मारवाडे ह्यांच्यावर वेळीच कारवाई केल्या गेली असती तर हा  प्रसंग टळला असता. आज मुडझा गावातील येथील रुग्णांचा जीव धोक्यात घातल्या गेला.भविष्यात ग्रामीण भागातील  रुग्णांचा सुद्धा जीव धोक्यात येऊ शकतो. इतर गावातील जनतेला सुद्धा मुडझा प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचाराला जावे लागते.

          प्रस्तुत प्रकरणात फक्त वाहनचालक जबाबदार नसून, तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत ज्यांनी वेळीच ह्या दारुड्या वाहनचालकाच्या वर्तनाच्या अनेक तक्रारी असूनसुद्धा कारवाई केली नाही.अशी चर्चा आरोग्य विभागात सुरु आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704