https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आपला जिल्हा

कारगील स्मारक केली साफसफाई

गडचिरोली,प्रतिनिधी:-

सिडीएस बिपीन रावत यांच्या पुण्यतिथी आणी संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागरिकांनी कारगील स्मारक ची स्वच्छता करून एक नवा आदर्श समाजापुढे निर्माण केला.

कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोली च्या वतीने दिनांक 8 डिसेंबर 2022 ला सकाळी कारगील स्मारक ची साफसफाई करण्या साठी  सर्व नागरिकांना  श्रमदान करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांनी केले होते.यांस उस्पृत प्रतिसाद मिळाला.

सदर स्मारक पाण्याने स्वच्छ करण्यासाठी लहान फायर ब्रिगेड ची मागणी उदय धकाते यांनी केली असता ती नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले.

नगर परिषद,गडचिरोलीने काही वर्षापूर्वी छोटी फायर ब्रिगेड खरेदी केली होती.शहरातील जुन्या वस्तीत लहान रस्ते असल्याने तिथे आपत्काळात सोईने पोहचता येईल .परंतु ही नादुरुस्त आहे.हे विशेष.

उदय धकाते,अध्यक्ष,कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ,गडचिरोली.

मागील पंधरा दिवसा पासून उदय धकाते यांनी नगर परिषदला स्मारकाची साफसफाई करण्याचि अनेकदा विनंती केली.परंतु सहकार्य मिळाले नाही.त्यांनी पुढाकार घेऊन आज सकाळी स्मारक स्वच्छ करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष उदय धकाते,मार्गदर्शक डॉ. नरेश बिडकर,नरेंद्र चन्नावार,हरबा मोरे,संजय मेश्राम,प्रमोद कोट्टावार,निलेश भुरसे,रुपेश सलामे,मोगली मसराम, मोसीम भाई शेख, रविभाऊ नैताम, निलेश भुरसे, प्रसाद पवार, किशोर चिचघरे, रविभाऊ किरमीरवार, सतीश बोदलकर, सुशील आईंचवार, शाम कोल्हटकर, गणेश सुत्रपवार आदी  उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704