https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आपला जिल्हा

ग्राहकांच्या न्याय्यहक्कांसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत लढणार… राष्ट्रीय सहसचिव जयंतीभाई कथेरिया

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

गडचिरोली येथे झालेल्या सभेत अखिल भारतीय ग्राहक पंचायत भारतातील सगळ्यात मोठी आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली अशासकीय संघटना आहे. आपल्या कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या फसवणुकीपासून सावधान करीत त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत विविध विषयांवर अभ्यास करून नवीन पारदर्शी कायदा करायला शासनाला प्रवृत्त करणारी ही संघटना आहे, असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सहसचिव जयंतीभाई कथेरिया यांनी या सभेला मार्गदर्शन केले.

गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या संघटन वाढिस भरीव अशी कामगिरी आजतागायत केलेली असून आज बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या फसवणुकीच्या प्रकारात वेगवेगळे बदल झाले असून सुशिक्षित व्यक्ती सुद्धा आपले कर्तव्य व इतर हक्क विसरत चालला आहे. कुठल्याही वस्तू वा सेवा प्रकारची खरेदी, आनलाईन खरेदी करताना त्याची होणारी फसवणूक ही वाढू लागली आहे अशा स्थितीत त्याला योग्य मार्गदर्शन व उपयुक्त सल्ला व माहिती मिळणं आवश्यक आहे असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नाराणय मेहरे यांनी  मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नाराणय मेहरे यांनी  मोलाचे मार्गदर्शन केले.

या प्रसंगी  गडचिरोली कार्यकारिणीचे  मार्गदर्शकपदी प्रकाश पाठक,  जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पतरंगे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश त्रिनगरीवार, जिल्हा उपाध्यक्ष पल्लवी कोंडावार, जिल्हा सचिव उदय धकाते, जिल्हा सहसचिव मिलिंद उमरे, जिल्हा सहसचिव डॉ. महेश जोशी, जिल्हा संघटनमंत्री विजय कोतपल्लीवार,  जिल्हा सहसंघटनमंत्री शेमदेव चाफले, जिल्हा कार्यालय प्रमुख सुभाष धंदरे, कोषाध्यक्ष नितीन भडांगे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नीलेश पटले, जिल्हा महिला प्रमुख अंजली कुळमेथे, जिल्हा सह महिला प्रमुख जिल्हा विधी सल्लागार अॅड. नीलकंठ भांडेकर, जिल्हा विधी सल्लागार अॅड. प्रमोद बोरावार, जिल्हा कार्यकारिणी सदस्यांमध्ये प्रशांत  भृगवार, नरेश सोनटक्के, उदय बोरावार, विलास भृगुवार, गीता कस्तुरे आदी उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704