आपला जिल्हा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शास. औ. प्र. संस्थेची तिरंगा रॅली

गडचिरोली,प्रतिनिधी :-

   देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने थोर क्रांतिकारकांना  अभिवादन करण्यासाठी तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन गडचिरोली शहरात करण्यात आले होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ते प्रसिद्ध कारगील स्मारक चौक या मार्गाने रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. 

कारगील स्मारक येथे पायदळ  रॅली पोहचल्यावर तेथील शहिद स्मारकास मानवंदना आणि थोर  शहिदांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कारगील स्मारक समितीचे अध्यक्ष उदय धकाते विशेषत्वाने उपस्थित होते. 

रॅलीच्या यशस्वीतेसाठी सर्व निदेशकांनी कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले. गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीने रॅलीच्या यशस्वीतेसाठी उत्तम सहकार्य मिळाले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.