https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
सामाजीक

जागतीकआदिवासी दिवस उत्साहात साजरा

गडचिरोली,प्रतिनिधी :-

९ ऑगस्ट २०२२ रोजी आदिवासी परधान समाज मंडळ, शाखा गडचिरोली येथील समाज मंदिरात जागतीक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.

परधान समाज मंडळाचे अध्यक्ष  प्रदीप मडावी यांनी भगवान बीरसा मुंडा, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके, जिल्हयाचे शिल्पकार मा.स्व. बाबुरावजी मडावी यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीपप्रज्वलन करुन त्यांच्या आदिवासी समाजाप्रती बहुमोल त्यागाची आठवण करून देताना सांगितले की, आदिवासी दिवस साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट १९९४ घोषित केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखित सविधानात आदिवासी समाजाच्या विकासासठी तरतूद करण्यात आली. जेणेकरून आदिवासी जमात विकासाच्या प्रवाहात आदिम जमातीच्या सर्वांगीण विकास करुण देशाच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलावा.

या कार्यक्रमा प्रसंगी समाज मंडळाचे सहसचिव नरेंद्र शेडमाके, राकेश कुळमेथे,अजय सूरपाम, देवराव कोवे,विवेक वाकडे,आकाश कुळमेथे,  ताजीसा कोडापे, विक्की मसराम,अंकुश बारसागडे, साहिल शेडमाके, अजय सिडाम,  अजय मसराम,महादेव कांबळे यांच्यासह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय सुरपाम, सुधीर मसराम, वैभव रामटेके, रोहीत आत्राम, साहिल गोवर्धन, यश कुळमेथे यांनी मोलाचे सहकार्य केले.

सदर कार्यक्रमाचे संचालन युवा सदस्य रुपेश सलामे यांनी केले तर आभार महेन्द्र मसराम यांनी मानले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704