क्रीडा व मनोरंजन
खेळाडूंना सोयी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध– खासदार अशोक नेते
गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात दर्जेदार खेळाडू निर्माण होत आहेत मात्र त्यांना सोयी सुविधा व मैदान उपलब्ध नसल्याने वरच्या पातळीपर्यंत ते पोहोचू शकत नाही. सोयी-सुविधा अभावी येथील खेळाडू मागे पडलेले आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. खेळाडूंच्या विकासासाठी त्यांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही खासदार अशोक नेते यांनी दिली रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अनुराग पिपरे फ्रेंड्स क्लब गडचिरोली व जय दुर्गा उत्सव मंडळ एकता चौक इंदिरानगर गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा समारोप काल दि. 5 जानेवारी रोजी करण्यात आला.
बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते होते. मुख्य अतिथी म्हणून गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. प्रणील गिल्डा, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, प्रायोजक डॉ यशवंत दुर्गे, डॉ अनंत कुंभारे, रविभाऊ मेश्राम, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष गजाननराव नैताम, दैनिक पुण्यनगरी चे जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर, दैनिक भास्कर चे जिल्हा प्रतिनिधी रुपराज वाकोडे, प्रफुल चापले, महिला आघाडी च्या शहर अध्यक्ष कविता उरकुडे, भाजपचे शहर उपाध्यक्ष विवेक बैस, नितेश खडसे, गजेंद्र डोमळे, विलास नैताम, नरेंद्र भांडेकर, शहर महामंत्री रश्मी बाणमारे, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, स्पर्धेचे आयोजक अनुराग पिपरे, ऋषिकेश पिपरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 31000 रुपये व आकर्षक चषक मुल क्रिकेट संघाने पटकाविला तर, द्वितीय पुरस्कार 21000 रुपये व आकर्षक चषक जय बजरंग संघ गडचिरोली ने पटकाविला तृतीय पारितोषिक 11,000 रुपये व आकर्षक चषक नितीन गेडाम क्रिकेट संघाने पटकाविला तर चतुर्थ पुरस्कार 5100 रुपये व आकर्षक चषक इंदिरानगर क्रिकेट संघाने पटकाविला.