बाल वैज्ञानिक गूणवंत विद्यार्थ्यांचा प्रा. नितिन लोहट यांच्या हस्ते सत्कार.
मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालूक्यातील मानवत रोड येथील जिजाऊ ज्ञानतिर्थ विद्यालयातील डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत सेकंड लेव्हल साठी पात्र झालेल्या इयत्ता सातवीच्या रोहन कातारे, आदित्य पठाडे, भार्गवी तारे, सोनाक्षी भिसे या गुणवंत विद्यार्थ्यांना जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्थेचे संस्था सचिव तथा मुख्याध्यापक प्रा. नितीन लोहट सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करून सत्कार करण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख अशोक दुधारे सर, डॉ. होमी भाभा स्पर्धा परीक्षा प्रमुख सुनील काळे सर यांची उपस्थिती होती*
ही स्पर्धा मुंबईच्या मुंबई सायन्स टिचर्स असोसिएशन तर्फे आयोजित केली जाते. ही सायन्स विषयाची objective परिक्षा आहे. यात ९० मिनिटात १०० प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला ४ पर्याय उत्तरांचे दिलेले असतात व योग्य पर्याय निवडायचा असतो. प्रत्येक बरोबर उत्तराला १ गुण मिळतो. चुकीच्या उत्तराला शून्य गुण दिल्या जातात डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा विभाग
जिजाऊ ज्ञानतीर्थ, विदयालय मानवत रोड, ता.मानवत जि. परभणी
***