वाळूज येथील पारधी समाजातील कुटूंबावर अत्याचार करणाऱ्यावर कडक कारवाई करा
वंचित बहुजन आघाडीची मानवत तहसीलदार यांच्याकडे मागणी
मानवत / प्रतिनिधी.
आष्टी तालुक्यातील वाळूज येथे पारधी समाजातील कुटूंबावर अत्याचार करणाऱ्या गावगुंडावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मानवत तहसीलदार रणजितसिंग कोळेकर यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचा वतीने करण्यात आली आहे. आष्टी तालुक्यातील वाळूज येथे पारधी (आदीवासी ) समाजातील कुटूंबावर भाजपाचे स्थानिक आमदार सुरेश धस यांच्या पत्नी सह काही गावगुंडानी महिलेची विवस्त्र करुन धिंड काढली ही घटना पुरोगामी म्हणवनाऱ्या महाराष्ट्राला काळिमा फसणारी असून मानवतेला ही कलंक लावणारी बाब आहे. सदरील घटनेमधील महिलेसह तिचा कुटूंबावर अन्याय अत्याचार करणाऱ्या स्थानिक आमदार सुरेश धस सह आरोपी करुन त्यांची पत्नी व इतर सहभागी गावागुंडाना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व पीडित कुटूंबास न्याय द्यावा अन्यथा मानवत तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ही दिलेल्या निवेदनाद्वारे दिला असून निवेदनावर भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष धम्मपालजी सोनटक्के, जिल्हा सचिव तुकाराम भारती, तालुकाध्यक्ष अॅड. दिगांबर घुगे, महिला ता. अध्यक्ष मंदाकिनी राठोड, मा. ता अध्यक्ष गौतम साळवे, बापूराव धबडगे, विश्वनाथ गवारे, गुंडिबा हारणे, गजानन राठोड, विश्वनाथ गायकवाड, हरिभाऊ पंडित, बाबासाहेब वाकळे, दत्ता तुपसमुंद्रे, प्रकाश कांबळे, भीम राव लाटे, शेषेराव कनकुटे यांच्या सह वंचित बहुजन आघाडीचा पदाधि काऱ्यांच्या व कार्यकर्त्याच्या स्वाक्षऱ्या आहेत.
**