https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आपला जिल्हा

धवल क्राॅन्तिने शेतकर्‍यांच्या जिवनात अमूल च्या माध्यमातून अमूलाग्रह बदल होणार. भूषण चांडक( उद्योजक )

मानवत,:

शेतकऱ्यांच्या दारी येऊन अमूल दूध खरेदी करतेय शिवसेनेचे आ. डॉ. राहुल पाटील व मानवत नगरीचे यूवा उद्योजक भूषण चांडक यांच्या पुढाकारातून मानवत येथील किसान कृपा डेअरीमध्ये दूध खरेदीस प्रारंभ करण्यात आला असून या दूध संकलन धवल क्रांन्ति मधून मतदार संघातील हजारो शेतकरी व पशूपालक बांधवांना याचा लाभ होऊन शेतकर्‍यांच्या जिवनात अमूल च्या माध्यमातून अमूलाग्रह बदल होणार असल्याचे मत या प्रसंगी युवा उद्योजक भूषणजी चांडक यांनी व्यक्त केले.

सविस्तर वृत्त असे की,
भारतात प्रसिद्ध असलेल्या गुजरात येथील अमूल च्या वतीने परभणी जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दूध खरेदी केले जात आहे. शुक्रवार, दिनांक . 27 रोजी मानवत येथील किसानकृपा डेअरीमध्ये साबरकांठा जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघ म्हणजेच सर्व परिचित असलेले अमूल च्या वतीने दूध खरेदीचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी डॉ. वेदप्रकाश पाटील, बालकिशन ( भाऊ ) चांडक, शिव सेना आ. डॉ. राहुल पाटील, अमूल इंडियाचे हरेशभाई पटेल, उद्योजक भूषण चांडक, डॉ. राजेश दाभाडे, डॉ. विवेक नावंदर, यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
परभणी जिल्ह्यातील दूध उत्पादकांना त्यांच्या दूध विक्रीचे पैसे वेळेवर मिळाले तर त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल व त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन जीवनमान उंचावेल या हेतूने शिव सेना आ.डॉ.राहुल पाटील व उद्योजक भूषणजी चांडक यांनी अमूल च्या माध्यमातून दूध खरेदी व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले.
*कसा होणार लाभ*
परभणी जिल्ह्यात हजारो दूध उत्पादक शेतकरी आहेत. तर यापैकी अनेकांचा दूध उत्पादन हा मुख्य व्यवसाय आहे तर शेतकरी वर्गात शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला जातो.
सर्वसाधारपणे दूध उत्पादकांना दूध विक्रीचे पैसे महिण्याकाठी मिळतात. मात्र अमूल दूध खरेदी केल्यानंतर दुधाचे पैसे दहादिवसाआड देते. तसेच पैसे उत्पादकांच्या थेट खात्यात जमा केले जातात.
*दूध कसे होणार संकलन?*
शेतकरी व दूध उत्पादकांना दूध विक्रीसाठी शहरांत यावे लागते. त्यासाठी दररोजचा इंधन खर्च लागतो. मात्र अमूलच्या माध्यमातून दूध उत्पादकांच्या गावात दूध संकलन केंद्र उघडले जात आहे. व या दुध संकलन केंद्रात शेतकर्‍यांना दूध विक्री करता येणार असल्याने शेतकऱ्यांचा हा खर्च वाचणार आहे.
परभणी, मानवत, पाथरी,सेलू, सोनपेठ, गंगाखेड, माजलगाव, मंठा, परतूर तालुक्यात दूध संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केंद्रावर अमूलच्या वतीने दूध खरेदी केले जाणार आहे.
संकलित दूधावर किसानकृपा डेअरी मानवत येथे प्रक्रिया केली जाणार आहे.
*जिल्ह्याला कसा होणार फायदा?*
परभणी जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर शेतीला जोड व्यवसायाच्या माध्यमातून दूध उत्पादन केले जाते. तसेच मुख्य व्यवसाय म्हणूनही दूध उत्पादन केले जाते. दूध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थकारण मोठ्या प्रमाणावर प्रभावित होते. तसेच दुध उत्पादकांना वेळेवर पैसे मिळाल्याने ग्रामीण अर्थचक्राला चालना मिळते. म्हणून या प्रकल्पामुळे हजारो शेतकरी दूध व्यवसाया कडे वळणार आहेत. जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतकर्‍यांना याचा थेट फायदा होणार आहे.

****

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704