https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत शहरातील अवैध सावकाराच्या घरी धाड धाडीमूळे अनेकांचे धाबे दणाणले.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरा मध्ये अवैध सावकारी करणाऱ्या एका इसमाच्या घरी सहकार विभागाने १४ जुलै रोजी धाड टाकून संधिग्ध कागदपत्रे जप्त केली यामुळे मानवत तालुक्यात एकच खळबळ उडाली तर अनेकांचे धाबे दनाणले आहे.
मानवत शहरामध्ये अवैध सावकारी संदर्भात सहकार विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या तक्रारीची विभागाने दखल घेत मा. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आंचल गोयल, परभणी पोलिस अधीक्षक रागसुधा आर, विभागीय सहनिबंधक डॉ. मुकेश बारहाते, जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव, मानवत पोलीस स्टेशनंचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहाय्यक निबंध एम. बी. धुमाळ यांच्या पथकाने शहरातील अवैध सावकार बाबासाहेब नामदेव साबळे यांच्या घरी १४ जुलै रोजी सकाळी साडे आठ वाजता घराची झाडाझडती घेतली.
या वेळी या ठिकाणी संधिग्ध व्यवहाराचे खरेदी खत खिशातील नोंदवही, धनादेश अधिक कागदपत्रे आढळून अली सर्व कागदपत्र जप्त केली असून कागदपत्रा संदर्भात सहकारी विभागाकडून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या वेळी शासकीय पंच उपस्थित होते धाड टाकून कारवाई केलेल्या पथक मध्ये एम. बी. धुमाळ, शेख उस्मान, एस. एन पुंजारे, पी. यु. वारे, अलका जवळेकर यांच्या सह पोलीस पथकातील सहाय्यक पोलिस उप निरिक्षक सुभाष नाईक, एस. टी शेख, महिला पोलीस एस. बी शेख यांचा समावेश होता सावकारी सिद्ध झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागाने दिली आहे. तसेच विनापरवानगी सावकारी करणाऱ्या सोबत कोणत्या ही प्रकारची आर्थिक देवाण करू नये अवैध सावकारी संदर्भात कोणाची तक्रार असल्यास पुराव्यासह सहाय्यक निबंध कार्यालयात तक्रार दाखल करावी असे आवाहन सहायक निबंधक कार्यालयाचा वतीने करण्यात आले आहे. सावकारी संबंधित कोणाची तक्रार असल्यास पुराव्या सह सहाय्यक निबंध कार्यालयात तक्रार दाखल करावी असे आवाहन एम. बी. धुमाळ प्रभारी सहायक निबंधक कार्यालय मानवत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704