https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

२१ वी आणि २२ वी अमरनाथ यात्रा तसेच १२ वी चारोधाम यात्रा यशस्वी झाल्या प्रित्यर्थ महाप्रसादाच्या आयोजन

नांदेड:
२१ वी आणि २२ वी अमरनाथ यात्रा तसेच १२ वी चारोधाम यात्रा यशस्वी झाल्या प्रित्यर्थ तसेच अधिक मासाच्या पावन पर्वा निमित्त शुक्रवार दि.२८ जुलै रोजी दुपारी १२ ते ३ दरम्यान स्वामी समर्थ मंदिर, सोमेश कॉलनी, नांदेड येथे महाप्रसाद व धोंडे जेवण ठेवण्यात आले आहे. यावेळी अमरनाथ यात्रेमध्ये अन्नदान करणाऱ्या अन्नदात्यांचा, भाऊचा माणुसकीचा फ्रिज, लायन्सचा डबा मधील अन्नदात्यांचा तसेच अमरनाथ यात्रेला विस्तृत प्रसिद्धी देणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

गेल्या वीस वर्षापासून दिलीप ठाकूर हे अमरनाथ यात्रा यशस्वी झाल्यानंतर दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करतात. यावर्षी दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दोन जथ्यामध्ये १४६ यात्रेकरूंनी अवघड असलेली अमरनाथ यात्रा पूर्ण केली.५३ यात्रेकरूंची चारोधाम यात्रा पूर्ण झाली.२१ वर्षात शेकडो भाविकांचे माफक दरात तीर्थाटन झाले. दिलीप ठाकूर यांनी तब्बल २२ वेळा अमरनाथचे,२६ वेळा वैष्णोदेवीचे आणि २८ वेळा अमृतसर येथील सुवर्णंमंदिराचे दर्शन घेतले आहे.अमरनाथ यात्रेमध्ये खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,डॉ. अजयसिंह ठाकूर पूर्णा,मनोज शर्मा नागपूर, सरदार कुलदीपसिंघ लुधियाना,ओमप्रकाश पाम्पटवार,प्रतिभा राजेंद्र चौधरी परभणी,सतीश सुगनचंदजी शर्मा,नवनाथ सोनवणे उदगीर, हृदयनाथ सोनवणे,ज्ञानोबा जोगदंड जम्मू,नागेश शेट्टी, सरदार जागीरसिंघ अमृतसर,सुभाष बंग,निलेश बोंबले व गोपाळ नागपुरे अकोला,स्नेहलता जैस्वाल हैद्राबाद ,प्रदीप शुक्ला भोपाळ,सरदार कुलदीपसिंघ लुधियाना,महेश जायस्वाल यवतमाळ,माधुरी आशीष लाठकर यांनी अन्नदान केले.यात्रेकरूंपैकी अशोक जायस्वाल पूर्णा, मिना कुलकर्णी,अरुण लाठकर,दिगम्बर शेंदूरवाडकर, श्याम रावके, शशिकांत कुलकर्णी,मुकेशसिंह तौर, गंगाधर फलटणकर, रेखा देशपांडे, श्रीकांत कुलकर्णी, सुधाकर ब्रह्मनाथकर,विशाल राठी, ब्रिजकिशोर दरक, विशाल मंत्री, बालाजी कवाणकर, शंकरराव देशमुख यांनी अन्नदानात सहभाग नोंदविला.भाऊचा माणुसकीचा फ्रिज, लायन्सचा डबा मध्ये अनेकजण अन्नदान करतात. तसेच माध्यम प्रतिनिधींनी वेळोवेळी यात्रेची विस्तृत माहिती दिल्यामुळे आप्तस्वकीयांना दिलासा मिळाला. त्यामुळे अन्नदाते व माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार आहे.तरी जास्तीत भाविकांनी येऊन महाप्रसादाचे ग्रहण करावे असे आवाहन अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व राजेशसिंह ठाकूर यांनी केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704