अहेरी,प्रतिनिधी :-
नगरपंचायत अहेरी अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र.5 मधील प्रभुसादन परिसरातील नागरिकायांच्या घरी जाऊन भेट देण्यात येऊन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांचे कडून किट वाटप व आर्थिक मदत आली. त्याचप्रमाणे पूर पीडीत असलेल्या नागरिकांन सोबत चर्चा करून शासनाकडून त्वरित नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
पुराचा पाण्यात घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेले व सतत चालू असलेल्या पावसामुळे हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची पाळी उद्भवली होती. हि बाब अहेरी नगरपंचायत चे उपाध्यक्ष शैलेंद्रभाऊ पटवर्धन यांना माहीती मिळताच अजयभाऊ कंकडालवार यांना पाचारण करून त्या ठिकाणी असलेल्या पूर पिडीत नागरिकांना जीवनावश्यक असलेले किट व आर्थिक मदत देणात आले.
यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायत चे अध्यक्ष कु.रोजाताई करपेत,अहेरी न.प.चे बालकल्याण सभापती मीनाताई ओंडरे,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक,विलास सिडाम,विलास गलबले,महेश बाकेवार,ज्योतीताई सडमेक,सुरेखा गोडसेलवार,निखत रियाज शेख,हरी श्रीनिवास छाटारे,सलाम शेख,रमेश वते वड्डे,नानाजी लालसू नारोटे,सुखराम सोनू मडावी,कोरके रामा मडावी,सुरेश ऋषी मडावी,मदाना शंकर आत्राम,सोमी सुखराम मडावी,महेश चिंना मडावी,महेश दिवाकर मडावी व इतर नागरीक उपस्तीत होते.
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.