https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत *माता पालक मेळावा संपन्न

मानवत / प्रतिनिधी.
मानवत शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या मुलांचा शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत हा माता – पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास माता पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी मानवत सावरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. शिरीषजी लोहट हे उपस्थित होते. तर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोरोबा बनसोडे यांची ही उपस्थिती होती. या मेळाव्यास भर पावसात बहुसंख्येने माता – पालकांची उपस्थिती होती. माता – पालकांचा मेळावा श्री. सोळंके यांच्या मार्गदर्शनाने सुरु झाला. या नंतर काही माता – पालकांनी आपली बोलण्याची तयारी दाखवली. यात पाच ते सहा मातांनी आपले शाळे विषयी व आपापल्या मुलांच्या प्रगतीचा वेग या वर प्रकाश टाकला. तसेच अ‍ॅड. श्री.कांचन राठोड यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. तर मानवत केंद्राचे केंद्र प्रमुख श्री. शिरीषजी लोहट यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपले मनोगतात विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये शिक्षक व पालकांची भूमिका या विषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. तसेच आपल्या विद्यार्थ्यांला चांगला माणूस बनवण्या साठी, उच्चशिक्षित, आदर्श नागरिक बनवण्यासाठी आपण आपल्या पाल्याचा पाया मजबूत केला पाहिजे म्हणजे त्या वर छानशी बिल्डिंग तयार करता येईल. अशा साध्या आणि सरळ व सोप्या उदाहरणातून त्यांनी उपस्थित मातांना पालकांना सविस्तर असे मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी जेंव्हा जेंव्हा माता पालकांच्या बैठकीचे आयोजन केले जाईल तेंव्हा तेंव्हा आपण सर्व माता पालकांनी उपस्थित रहावे अशी सूचना ही त्यांनी या वेळी केली. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरासह सर्वांचे आभार श्री. बाबासाहेब पानझाडे यांनी मानले तर माता पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी श्री. राजकुमार लांडे यांच्या सह शिक्षक व कर्मचारी बांधवानी प्रयत्न केले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704