ताज्या घडामोडी

बीड आगाराची शिवशाही नंतर आता साधी बस सूध्दा दे ! धक्का

बीड -परभणी कडे धावणार्‍या बसेसकडे आगार प्रमूखांचे दूर्लक्ष.

*मानवत / प्रतिनिधी.*

*बीड – परभणी राष्ट्रीय महामर्गासह राज्य मार्गावर बीड आगाराच्या मोठ्या प्रमाणात फेर्‍या असून या मार्गावर रा.प.म.च्या बीड आगार प्रमूखाचे दूर्लक्ष असल्यामूळेच नादूरूस्त बसेस या मार्गावर धावत आहे. गेल्या आठवड्यात शिवशाही तर आज साधी बस नादूस्त असल्यामूळे प्रवाशांना धक्का मारण्याची वेळ आली तर नादूरूस्त बस मूळे प्रवाशाना नाहक त्रास सहन करण्याची पाळी आली.नादूरूस्त बसमूळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.


*बहूजन हिताय, बहूजन सुखाय असे बिरूद घेऊन धावणार्‍या बसेस नेहमीच नादूस्त होत असल्या मूळे बहूजनांना दूखा:य होत आहे. तर या सर्व बाबीकडे बीड आगार प्रमूखांचे दूर्लक्ष होत असल्यामूळे सामान्य बहूजन प्रवाशामधून संताप व्यक्त केला जात आहे.*


सविस्तर वृत्त असे की, बीड —परभणी या राष्ट्रीय महामार्गावर राज्य परिवह महामंडळ बीड , या आगारातून मोठ्या फेर्‍या धावतात.
बीड आगार प्रमूखाचे दूरर्लक्ष असल्यामूळे नादूरूस्त बसेस ची संख्या वाढत आहे. गेल्या आठवड्यात अशीच शिवशाही , व आज साधी बस नादूस्त असल्यामूळे प्रवाशांना दे ! धक्का मारण्याची वेळ आली आहे. प्रवांशी म्हणेल ते भाडे देऊन सुध्दा रापम प्रवाशांना सेवा देण्याऐवजी चालक वाहक अरेरावी करून शिव्या देत त्यामूळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात.
बीड आगार प्रमूखाचे दूर्लक्ष असल्यामूळे वारंवार नादूरूस्त बसेसचा सामना बहूजन प्रवाशांना करावा लागत आहे. *बहूजन हिताय म्हणनार्‍या रा.प.म.ने या मार्गावरून *शिवशाही व नादूरूस्त बसेसचा प्रवास थांबवावा अशी मागणी प्रवांशा मधून होत आहे.*
बीड आगार प्रमूखांने लक्ष न दिल्यास भविष्यातत मोठे आंदोलन ऊभे राहिल अशी भावना प्रवाशा मधून व्यक्त केल्या जात आहे. नादूरूस्त बसेस मूळे नाहक चालक वाहकांना सुध्दा प्रवाशांच्या रोशाला ( संतापाला ) तोंड देण्याची पाळी आली आहे.
*जनाची नाही पण मनाची लाज धरून *बहूजन हिताय, बहूजन सुखाय या बिरूदाची तरी लाज रा.प.मं.च्या बीड आगाराने ठेवायला हवी*

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.