https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
सामाजीक

प्रशिक्षणाच्या माध्यमातून पतसंस्था सुदृढ कराव्यात- विवेक जुगादे

गडचिरोली,प्रतिनिधी :-

सहकार प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या पतसंस्था सुदृढ कराव्यात, पतसंस्था सुदृढ झाल्यास सहकार सुदृढ होईल, सहकार सुदृढ झाल्यास देश सुदृढ होईल आणि देश सुदृढ झाल्यास समाज सुदृढ होईल अशी मोठी विकासाची शृंखला असून   सर्वांनी मिळून  सहकाराच्या विकासासाठी संघटितपणे प्रयत्न करावा आणि विकासाची सुरुवात सर्वप्रथम आपल्या पतसंस्थेतून  करावी असे मोलाचे मार्गदर्शन सहकार भारतीचे महाराष्ट्राचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी दोन दिवशीय सहकार प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून केले.

गडचिरोली जिल्हा पगारदार कर्मचारी व नागरी तथा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था संघ मर्यादित गडचिरोली, सहकार भारती व सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी इंग्लिश अकॅडमी स्कूल येथे आयोजित दोन दिवशीय सहकार प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

     यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा पतसंस्था संघाचे अध्यक्ष दिलीप पाटील खेवले तर प्रमुख अतिथी म्हणून सहकार विभागाचे अधिकारी विजय पाटील, पतसंस्था संघाचे मानद सचिव प्रा. शेषराव येलेकर, दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती सुमतीताई मुनघाटे, मानद सचिव श्रीमती सुलोचनाताई वाघरे, संस्कार क्रेडिट पतसंस्थेचे अध्यक्ष मनीष फाये मंचावर उपस्थित होते.

     विवेक जुगादे पुढे म्हणाले संस्था मुदत ठेवी, कर्जवाटप, गुंतवणूक व नफा या चार गोष्टीवर चालते. पतसंस्थांनी आवश्यक तेवढ्याच मुदत ठेवी स्वीकाराव्यात, जादा व्याजदर  देऊन उगाच ठेवी मिळवण्याच्या मागे जास्त धावू नये, ग्राहकांचा विश्वास असेल तर कमी व्याजदरावर सुद्धा ते तुमच्या संस्थेत ठेवी ठेवतील, मुदत ठेवीपेक्षा बँका प्रमाणे कासा डिपॉझिट (करंट अँड सेविंग अकाउंट) चे प्रमाण वाढवण्यावर भर द्यावा त्यामुळे तुमचे कर्ज वाटपाची समस्या दूर होईल. त्याचप्रमाणे कर्ज वितरण करताना ग्राहकांचा शिबिल ओळखून त्याला कर्ज दिले पाहिजे त्यामुळे थकीत दाराचे व कर्जबुडव्यांचे प्रमाण कमी होईल.  पतसंस्थांनी गुंतवणूक करताना एकाच ठिकाणी ती करू नये, एकाच ठिकाणी एकूण ठेवीच्या पाच टक्के पेक्षा जास्त गुंतवणूक करू नये असे ते म्हणाले. अडचणीच्या प्रसंगांना समर्थपणे तोंड देण्यासाठी पतसंस्थांनी स्वतःचा गुंतवणूक अस्थिरता निधी उभारावा ,  कमी व्याजदर व चांगले ग्राहक मिळवण्यासाठी क्यू-आर कोड चा वापर करण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी दिला.

      कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप पाटील खेवले यांनी पतसंस्थांना चांगले दिवस येण्यासाठी शिक्षण व प्रशिक्षणाशिवाय पर्याय नाही, आधुनिक बँकिंग तंत्र प्रणालीचा वापर करून पतसंस्थांनी आपली प्रगती साधावी असे ते म्हणाले. यावेळी सहकार विभागातील अधिकारी विजय पाटील, मनीष फाये यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा. शेषराव येलेकर यांनी , संचालन शाखा व्यवस्थापक भूषण रोहनकर तर  आभार प्रदर्शन संघाचे व्यवस्थापक भास्कर  नागपुरे यांनी केले. कार्यशाळेला ज्येष्ठ सदस्य पी. टी. पुडके, डी.के. उरकूडे,मुकुंद म्हशाखेत्री,किशोर मडावी,भास्कर खोये,कृष्णा अर्जूनकर,मनोज बैरागी, लींगाजी मोरांडे तसेच  जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे 150 वर अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704