https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथील महात्मा फुले नगरातील नाले साफ सफाई करा, शिवसेनेची मागणी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील प्रभाग क्रं ०९ मधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची अत्यंत दुरावस्था झाली असून येथील नाल्याची साफ सफाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने मानवत नगर परिषदेचा मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांच्या कडे ०१ ऑगस्ट रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मानवत शहरातील प्रभाग क्रं.०९ मधील महात्मा फुले नगरात सांड पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची अत्यंत दुराव स्था झाली असून यामुळे हे घाण पाणी नागरिकांच्या दारासमोर येत आहे. तसेच येथील नाल्या तुंबल्याने हे घाण पाणी येथील दारात साचत आहे व यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे सदरील ही बाब वेळोवेळी नगरपालिका कर्मचाऱ्यांना कळविण्यात आली आहे.
परंतु याबाबत कोणतीही दखल घेतली जात नाही तरी सदरील ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ योग्य ते नियोजन करावे अशी मागणी दिलेल्या निवेदना द्वारे करण्यात आली असून निवेदनावर शिवसेना उपशहर प्रमुख बरसातसिंग बावरी, किरण भैया पंडित, वैभव घाटूळ, दशरथ लगड, अरुण घाटूळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704